पहिल्या खेलो इंडिया ट्रायबल गेम्स 2025-26 साठी राज्यस्तरीय निवड चाचणीत सहभागी होण्याचे आवाहन

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 08/01/2026 8:52 PM

नांदेड :- केंद्र शासनाच्या निर्देशानुसार पहिल्या खेलो इंडिया ट्रायबल गेम्स 2025-26 चे आयोजन छत्तीसगड राज्यात करण्यात येणार असून, या स्पर्धेसाठी राज्य व राष्ट्रीय स्तरावर निवड चाचण्या घेण्यात येणार आहेत. ही स्पर्धा पुरुष व महिलांच्या खुल्या वयोगटात होणार आहे.

या स्पर्धेत एकूण सात खेळप्रकारांचा समावेश असून त्यामध्ये फुटबॉल, हॉकी, जलतरण, वेटलिफ्टिंग, आर्चरी, कुस्ती व अ‍ॅथलेटिक्स या खेळांचा समावेश आहे. राज्यस्तरीय निवड चाचणीमधून निवड झालेले खेळाडू व संघ राष्ट्रीय निवड चाचणीसाठी पात्र ठरणार असून, त्यानंतर अंतिम राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड केली जाणार आहे.

केंद्र शासनाच्या सूचनेनुसार संबंधित खेळांच्या एकविध राज्य संघटनांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेण्यात येऊन राज्यस्तरीय निवड चाचण्यांचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे.

राज्यस्तरीय निवड चाचणी कार्यक्रम
 (13 जानेवारी 2026)
आर्चरी, कुस्ती व वेटलिफ्टिंग
स्थळ : अमरावती
संपर्क : श्री. चांदेकर (9404379677), श्रीम. त्रिवेणी वान्ते (9975590232), शेख सलीम (9657277457)
हॉकी
स्थळ : नेवासा, जि. अहिल्यानगर
संपर्क : विशाल गर्जे – 8369539077
अ‍ॅथलेटिक्स
स्थळ : पालघर, जि. पालघर
संपर्क : अमृत घाडगे – 9870048649
जलतरण
स्थळ : महाळुंगे–बालेवाडी, पुणे
संपर्क : बालाजी केंद्रे – 9503548988
फुटबॉल
स्थळ : नागपूर
संपर्क : अनिल बोरावार – 9422559083

महत्त्वाच्या सूचना
निवड चाचणी अनुसूचित जमाती (Scheduled Tribes) प्रवर्गातील खेळाडूंकरिता असून जात प्रमाणपत्र, महाराष्ट्र अधिवास प्रमाणपत्र व मूळ आधारकार्ड अनिवार्य आहे.
सर्व खेळाडूंनी स्वखर्चाने निवड चाचणीत सहभागी व्हावे. निवास व भोजनाची व्यवस्था केवळ खेळाडूंसाठी करण्यात येईल.
सहभागी खेळाडूंनी आवश्यक क्रीडा साहित्य व संरक्षक साधने स्वतः आणणे बंधनकारक आहे.
दि. 12 जानेवारी 2026 पूर्वी संबंधित संपर्क प्रमुखांकडे नावनोंदणी करणे आवश्यक आहे.
वैयक्तिक खेळप्रकारांमध्ये आर्चरीत प्रत्येक प्रकारातील पहिले तीन, तर कुस्ती, अ‍ॅथलेटिक्स, जलतरण व वेटलिफ्टिंगमध्ये पहिले दोन खेळाडू राष्ट्रीय निवड चाचणीसाठी पात्र ठरणार आहेत.
हॉकी व फुटबॉल या सांघिक खेळप्रकारांमध्ये उत्कृष्ट संघाची निवड करण्यात येईल.
निवड चाचणीत सहभागी खेळाडूंना कोणतेही प्रमाणपत्र देण्यात येणार नाही.

तरी नांदेड जिल्ह्यातील जास्तीत-जास्त अनुसूचित जमाती प्रवर्गातील खेळाडूंनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा संकुल, इनडोअर हॉल, नांदेड येथे कार्यालयीन वेळेत सी. आर. होनवडजकर (7972953141) व श्रीमती शिवकांता देशमुख (9657092794) यांच्याशी संपर्क साधावा.

Share

Other News

ताज्या बातम्या