सांगली आणि मिरज सिविल हॉस्पिटल मध्ये सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प नसल्यामुळे हरित न्यायालयाने चार कोटी 62 लाख रुपये दंड ठोठावला आहे.
ह्यातून मा नाम हसन मुश्रीफ साहेब वैद्यकीय शिक्षण संशोधन मंत्री महाराष्ट्र राज्य व राज्य सरकार काय बोध घेणार आहे का?
टक्केवारीसाठी क्लबिंग टेंडर काढायची मर्जीतील ठेकेदाराला काम द्यायचं हाच फक्त उद्योग गेल्या कित्येक वर्षापासून सांगली मिरज सिविल हॉस्पिटलच्या बाबतीत चावला आहे
मग स्वच्छतेचे टेंडर असेल एम आर आय सी टी स्कॅन बिल्डिंग सह देण्यात येणारे टेंडर असेल अन्य खरेदीची टेंडर असेल ही डायरेक्ट क्लबिंग करायचे व मंत्रालयातून टेंडर काढून खालच्या अधिकाऱ्यांच्या वर प्रेशर आणायचे मॅनेज करून मर्जीतल्या कॉन्टॅक्टर ना काम द्यायचे ह्यासाठी यांना वेळ आहे मात्र हॉस्पिटल आवारात गरजेच्या सांडपाणी प्रक्रिया व इतर महत्त्वाच्या कामाबाबत यांना वेळ आणि पैसा नाही याबाबत यांचा जाहीर निषेध आहे
सदर पैसे हे मंत्री महोदय यांच्या खिशातून वसूल करावे अशी आमची विनंती आहे.
सतीश साखळकर,
नागरिक जागृती मंच सांगली जिल्हा.