कवलापूर विमानतळ विकसित करण्यासाठी आमच्या पद्धतीने पाठपुरावा सुरू आहे
महाराष्ट्र शासनाकडे आपले सरकार पोर्टल वरून तक्रार केली असता
काल दिनांक 15 मे 2025 रोजी महाराष्ट्र विमान कंपनीचा मेल आला.
दिनांक 28 एप्रिल 2025 रोजी एमआयडीसी सांगली जिल्हा अधिकारी कार्यालयाकडे महाराष्ट्र विमान कंपनीने पत्रव्यवहार केला असून कवलापूर विमानतळाच्या जागेची सद्य परिस्थिती नकाशे उतारे लोकेशन इत्यादी तात्काळ पाठवण्याच्या आदेश दिलेले आहेत
सदर कागदपत्रे प्राप्त होताच कवलापूर विमानतळाचे सर्वेक्षण सुरू करण्यात येणार आहे असे लेखी कळवण्यात आले आहे
गेल्या कित्येक वर्षापासून राज्यातील इतर जिल्ह्यातील विमानतळ विकसित झाली मात्र आपल्या सांगली जिल्ह्यातील कवलापूर येथील विमानतळ अजून पर्यंत रखडलेले आहेत
सदर जागेचा बाजार करण्याचा प्रयत्न विमानतळ बचाव कृती समितीच्या माध्यमातून हाणून पाडला.
लोकसभेच्या निवडणुका झाल्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या राज्यातील व केंद्रातील मोठ-मोठे नेते आले त्या सर्वांनी निवडणुकीच्या काळात कवलापूर विमानतळ विकसित करण्यासाठी आश्वस्त केले आहे.
खासदार विशाल दादा पाटील माजी मंत्री आमदार विश्वजीत कदम आमदार सुधीर दादा गाडगीळ सुरेश भाऊ खाडे साहेब दिवंगत आमदार अनिल भाऊ बाबर सर्वांनी लोकसभेत असेल विधानसभेत असेल प्रश्न उत्तर असतील लेखी पत्र असतील पाठपुरावा केला आहे मात्र त्याला अजून म्हणाव तसा प्रतिसाद मिळताना दिसत नाही.
पालकमंत्री मा नाम चंद्रकांत दादा पाटील यांनी सुद्धा जिल्हा दौऱ्यावर असताना पत्रकार आणि विचारल्यावर प्रश्न उत्तरे देताना आम्ही कवलापूर विमानतळ बाबत काम करायला उत्सुक असून लवकरच काम करू असे अस्वस्थ करत आहेत
एवढ्यावरच न थांबता सांगली जिल्ह्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी कवलापूर येथील लोकप्रतिनिधी सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी बाधित शेतकरी यांची व्यापक मीटिंग घेऊन लागणारी ज्यादा जागा संपादित करण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करणे आवश्यक आहे याबाबत सर्वांनी पुढाकार घ्यावा व सांगली जिल्ह्यातील कवलापूर विमानतळ विकसित झालेले बघण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा असे आवाहन करण्यात येत आहे.
सतीश साखळकर, माजी आम. नितीन शिंदे,पै. पृथ्वीराज पवार, हनमंतराव पवार, उमेश देशमुख, महेश खराडे, शंभूराज काटकर, विकास मगदूम, डॉ संजय पाटील,
कवलापूर विमानतळ बचाव कृती समिती सांगली जिल्हा.