सांगली जिल्हयातील सैनिक व प्रवाशांना मोठा दिलासा

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 16/05/2025 8:32 PM

सांगली जिल्हा नागरिक जाग्रुती मंचच्या प्रयत्नाने सांगली स्टेशनचा संपर्कक्रांती या महत्वपूर्ण एक्सप्रेस गाडीचा थांबा यापुढे सुरू राहील व किर्लोस्करवाडीचा गोवा एक्सप्रेसचा थांबा देखील सुरू राहील.

सांगली जिल्हातील सैनिक व  प्रवाशांना मोठा दिलासा

सांगली रेल्वे स्टेशन येथे यशवंतपूर-चंडीगड संपर्कक्रांती व चंडीगड-यशवंतपुर संपर्कक्रांती या महत्वपूर्ण एक्सप्रेस गाड्यांना सांगली जिल्हा नागरिक जागृती मंचच्या अनेक वर्षांच्या अविरत प्रयत्नानंतर प्रयोगिक थांबा मिळाला होता. त्याचप्रमाणे किर्लोस्करवाडी रेल्वे स्टेशनवर वास्को-निजामुद्दीन(दिल्ली) गोवा एक्सप्रेस व निजामुद्दीन-वास्को गोवा एक्सप्रेस या दोन गाड्यांना प्रायोगिक थांबा मिळाला होता.

या दोन रेल्वे गाड्यांमुळे सांगली जिल्ह्याचा संपर्क देशाच्या महत्त्वपूर्ण भागांशी जोडला गेला. 

प्रयोगिक तत्त्वावर 6 महिने भरपूर प्रवाशांनी प्रवास करावा यासाठी सांगली जिल्हा नागरिक जागृती मंचने या गाड्यांचे वेळापत्रक, तिकीट विक्री व तिकीट उपलब्धतेबाबत जनजागृती अभियान सुरू केले होते. त्याला मोठे यश मिळाले व या गाड्यांना सांगली व किर्लोस्करवाडीतून प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळाला.

सांगली जिल्हा नागरिक जागृती मंचने मध्य रेल्वे व दक्षिण पश्चिम रेल्वेला पत्र पाठवून सांगली रेल्वे स्टेशनवर संपर्क क्रांतीचा थांबा पुढे सुरू ठेवावा तसेच किर्लोस्करवाडीचा गोवा एक्सप्रेसचा थांबा देखील पुढे सुरूच ठेवावा अशी विनंती करण्यात आली ही विनंती मान्य करत दक्षिण पश्चिम रेल्वेने दिनांक 6 मे रोजी सांगली रेल्वे स्टेशनवर यशवंतपुर-चंडीगड संपर्कक्रांती व चंदिगड-यशवंतपुर संपर्कक्रांतीचा थांबा पुढे सुरू ठेवत असल्याची सूचना प्रसिद्ध केली. त्याचप्रमाणे किर्लोस्करवाडी रेल्वे स्टेशनचा गोवा एक्सप्रेस चा थांबा पुढे सुरू ठेवत असल्याची सूचना देखील दक्षिण पश्चिम रेल्वेने प्रसिद्ध केली आहे.

*संपर्कक्रांति चा सांगली थांबा सुरूच राहिल्यामुळे सांगली जिल्ह्याचा मोठा फायदा*
सांगली रेल्वे स्टेशन येथून देशाची राजधानी नवी दिल्ली जाणारी यशवंतपूर-चंडीगड संपर्कक्रांती एक्सप्रेस उपलब्ध झाली आहे. ही संपर्कक्रांती एक्सप्रेस बेंगलोरच्या यशवंतपूर स्टेशनवरून बुधवारी व शनिवारी दुपारी सुटून तुमकूर, आर्सिकेरी, दावणगिरी, हुबळी, धारवाड, बेळगाव येथे थांबून  गुरुवारी व रविवारी पहाटे 3:40 वाजता सांगली स्टेशन पोहोचते. सांगली स्टेशन वरून पहाटे 3:45 वाजता सुटून पुणे, मनमाड, भुसावल, भोपाळ, झांसी, नवी दिल्ली, पानिपत, अंबाला येथे थांबून चंडीगड पोहोचते.

*कर्नाटक ते सांगली स्टेशन येणारी सर्वात वेगवान रेल्वे गाडी*
कर्नाटकाच्या वेगवेगळ्या ठिकाणाहून सांगली येथे येण्यासाठी संपर्कक्रांति ही सर्वात वेगवान गाडी असून सुमारे साडे तेरा तासात बेंगलोर ते सांगलीचे अंतर कापते.
ही गाडी आता सांगली रेल्वे स्टेशनवर थांबत असल्यामुळे सांगली शहरातील व जिल्ह्यातील प्रवाशांची मोठी सोय झाली आहे. 
बेंगलोर येथे काम करणाऱ्या सांगली जिल्ह्यातील आयटी सॉफ्टवेअर इंजिनिअरना आता सांगली रेल्वे स्टेशनवरून बेंगलोर येण्या-जाण्यासाठी अनेक रेल्वे गाड्या उपलब्ध झाल्या आहेत.

*सांगली जिल्ह्यातील सैनिकांसाठी मोठा दिलासा*
सांगली जिल्ह्यातील हजारो सैनिक पंजाब व जम्मू कश्मीर येथील सीमेवर देश रक्षणासाठी तैनात असून या सर्व सैनिकांना आता थेट सांगली रेल्वे स्टेशन वरून चंडीगड पानिपत अंबाला तसेच नवी दिल्ली येथे जाता येत असल्याने सैनिकांची देखील मोठी सोय झाली आहे.

सांगली जिल्हा नागरिक जागृती मंच यापुढे देखील सांगली जिल्ह्यातील विविध स्टेशनवर नवीन रेल्वे गाड्या तसेच रेल्वे स्टेशनच्या विकासासाठी कार्य करत राहील.

*सांगली शहराला सोलापूर शहरातशी थेट एक्सप्रेस रेल्वे गाडीने जोडणार*
यामध्ये मुख्यत्वे 70 टक्के भरून जाणारी कोल्हापूर-सोलापूर-कलबुर्गी एक्सप्रेस रेल्वे गाडी सांगली मार्गे आणून सांगली रेल्वे स्टेशनवर थांबा मिळवण्यासाठी नागरिक जागृती मंच प्रयत्न करेल. सांगलीत थांबा दिल्यानंतर कोल्हापूर-सोलापूर-कलबुर्गी एक्सप्रेस गाडी पूर्ण भरून जाईल व या गाडीचे उत्पन्न देखील वाढेल.

*सांगली-जगन्नाथपुरी एक्सप्रेस व सांगली-मेंगलोर तिरुवनंतपुरम एक्सप्रेस नवीन गाड्या सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार*
सांगली रेल्वे स्टेशन येथून मिरज, सोलापूर, सिकंदराबाद(हैद्राबाद), विजयवाडा, विशाखापटनम मार्गे जगन्नाथ पुरी जाणारी एक्सप्रेस गाडी सुरू करण्याचे प्रयत्न देखील नागरिक जागृती मंच करणार. तसेच सांगली-मेंगलोर-तिरुवनंतपुरम एक्सप्रेस व सांगली-गदग-चेन्नई एक्सप्रेस सुरू करण्यात साठी प्रयत्न करणार.

हुबळी-पुणे वंदे भारत एक्सप्रेस गाडीला किर्लोस्करवाडी येथे थांबा मिळवणे, दादर-हुबळी एक्सप्रेस ला भिलवडी येथे थांबा मिळवणे तसेच कोल्हापूर एक्सप्रेस ला कवठेमंकाळ व जत रोड रेल्वे स्थानकावर थांबा मिळवणे यासाठी मंच प्रयत्न करणार आहे अशी माहिती अध्यक्ष सतीश साखळकर यांनी दिली.

Share

Other News

ताज्या बातम्या