कुपवाड हरित क्रांतीची सुरुवात - रणजित चंदनदादा चव्हाण
सध्या पर्यावरणाचा समतोल ढासळत चालला आहे, प्रदूषणाचा स्तर दिवसेंदिवस वाढतोय. मानवी जीवनशैलीतून उद्भवणाऱ्या असंख्य चुका – बेसुमार वृक्षतोड, अतिक्रमण, निसर्गाचं शोषण – यामुळे वसुंधरेवर गंभीर परिणाम होत आहेत. अशा काळात भविष्यासाठी पर्यावरणाचा विचार करून आजच कृती करणे अत्यंत आवश्यक आहे.ही गरज ओळखून जय हिंद युवा सेनेचे प्रमुख रणजित चंदनदादा चव्हाण यांनी पावसाळ्याच्या आगमनाच्या निमित्ताने एक विधायक उपक्रम हाती घेतला आहे.कुपवाड भागातील प्रमुख रस्त्यालगत तब्बल 200 करंज रोपांची लागवड करून, त्यांचे दीर्घकालीन संगोपन करण्याचा संकल्प त्यांनी आज केला आहे.
आज सोमवार रोजी सकाळी या उपक्रमाचा शुभारंभ पोलिस निरीक्षक श्री. दिपक भांडवलकर आणि उपयुक्त विजया यादव या अधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी पोलीस प्रशासनाने रणजित चंदनदादा चव्हाण यांच्या पर्यावरण पूरक उपक्रमाचे मनःपूर्वक कौतुक केले व शुभेच्छा दिल्या.
यावेळी बोलताना रणजित चंदनदादा चव्हाण म्हणाले, आजचा हा उपक्रम ही केवळ औपचारिकता नसून एक हरित परिवर्तनाची सुरुवात आहे. प्रत्येक व्यक्तीने किमान एक झाड लावले पाहिजे ही सामाजिक बांधिलकी आहे. आम्ही फक्त झाडे लावणार नाही, तर त्यांचे संगोपनही जबाबदारीने करणार आहोत.आमचा संकल्प आहे की कुपवाड परिसरातील रस्ते, मोकळी मैदानं, मंदिर परिसर, दवाखाने, शाळा – सर्वत्र देशी व पर्यावरणपूरक झाडांची लागवड करून ‘हरित कुपवाड’ घडवायचं आहे असेही त्यांनी ठामपणे सांगितले.
या वेळी सौ. कुरणे, श्री. विशाल घागरे,डॉ. मन्नान शेख,डॉ. आर. बी. पाटील,श्री. जरंडीकर,डॉ. चौगुले, श्री. शंकर कारंडे, श्री. ओलेकर, श्री. सूर्यवंशी,श्री. काटकर, रोहन जाधव, अर्जुन गेजगे, मारुती घुटूगडे, श्री. संतोष सरगर, श्री. पवार, अनेक मान्यवर स्वयंसेवी संस्था, पर्यावरणप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रणजित चंदनदादा चव्हाण व त्यांच्या जय हिंद युवा सेनेने घेतलेली ही पुढाकाराची भूमिका खरंच इतरांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.