पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भावे नाटय मंदिरात बहारदार गीत गायनाचा कार्यक्रम संपन्न

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 18/09/2025 12:52 PM

आदरणीय पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त'सेवा-७५ उपक्रमांतर्गत आज खचाखच भरलेल्या भावे नाट्यमंदीरात डॉ. सलील आणि शुभंकर कुलकर्णी यांचा 'धरोहर'- वारसा स्वरांचा हा गीत गायनाचा बहारदार कार्यक्रम झाला. गायनातून आनंद, उत्साह, भावनांचा कल्लोळ ओसंडून वाहताना श्रोत्यांनी दिलेली दाद लक्षवेधी ठरली. संगितामुळे आरोग्य व मूड सुधारते, एकत्र येण्याने सामाजिक संबंध मजबूत होऊन संवादातून संस्कृती बलिष्ट होते ही मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांची 'मन की बात सांगलीकरांनी अनुभवली आणि त्यांना सर्वांनीच उदंड दीर्घायुरारोग्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या..!

या कार्यक्रमास भाजपा प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार, माजी आमदार दिनकरतात्या पाटील, नितीनराजे शिंदे, शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, स्वातीताई शिंदे, भारती दिगडे, अजय देशमुख, सनी धोतरे, प्रशांत देशमुख, शीतल सदलगे, शुभम बनसोडे, आशिष चौधरी, प्रशांत अहिवळे, मयुरेश पेडणेकर भाजपा कार्यकर्ते आणि संगीतप्रेमी सांगलीकरांची उपस्थिती लक्षणीय होती.

Share

Other News

ताज्या बातम्या