*जबाबदार अधिकाऱ्यांवर सदस्य मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करा मनोज भिसे यांची मागणी*
सांगली प्रतिनिधी
लोकहित मंचच्या वतीने गेल्या अनेक महिन्यांपासून सांगली एस. टी. स्टॅन्ड ते कोल्हापूर रोडच्या दुरावस्थेबाबत आवाज उठवून प्रशासनाला याबाबत जाब विचारण्याचा प्रयत्न केला गेला. एखाद्या निष्पाप नागरिकाचा जीव गेल्यानंतरच प्रशासन जागे होणार का असा सवाल लोकहित मंचच्या वतीने उपस्थित करण्यात आला होता. आणि काल झालेही तसेच.या रोडवरील खड्ड्यामुळे शितल प्रकाश आंबरे या निष्पाप भगिनीचा जीव गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सार्वजनिक बांधकाम आणि सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका प्रशासनाकडून याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याने संबंधित विभागांसह संबंधित अधिकाऱ्यांवरही सदोष मनुष्यवराचा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी लोकहित मंचच्या वतीने आज कोल्हापूर रोडवर रास्ता रोको करण्यात आला.
याबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी लक्ष घालून ताबडतोब या रस्त्याचे काम करावे व मृत महिलेच्या नातेवाईकांना शासनाकडून आर्थिक मदत करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
हे आंदोलन लोकहित मंचचे अध्यक्ष मनोज भिसे, युवा नेते राजू नलवडे, युवा नेते मन्सूर नाईक यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. यावेळी एम आय एम शहराध्यक्ष. टिपू इनामदार, अबू गडेकर, यासीन मुल्ला, रमजान मदारी, अकबर मदारी, अतिक कुरेशी, आवेश काजी, तेजस तोही,नितीन कांबळे, अजिंक्य ताटे, अभिजीत हर्ष आदी नागरिक उपस्थित होते.