कुपवाड गावठाण व विस्तारीत भाग एकत्र करून स्वतंत्र प्रभाग करणे जास्त तर्कसंगत : प्रविण कोकरे

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 18/09/2025 8:45 PM

मी माझे कर्तव्य पार पाडले असून प्रभाग रचना  संदर्भात माझे म्हणणे महापालिका आयुक्त यांच्या पुढे मांडले आहे, कुपवाडचे विभाजन होऊ नये.

सध्या कुपवाड गावठाण हे प्रभाग क्रमांक 1, 2 आणि 8 मध्ये विभागले गेले आहे. प्रभाग रचना करताना प्रामुख्याने खालील तीन घटकांचा विचार केला जातो:

1. लोकसंख्या
2. भौगोलिक रचना
3. प्रशासकीय सुलभता

1) लोकसंख्या

प्रभाग क्रमांक 1, 2 आणि 8 यांची एकत्रित मतदारसंख्या जवळपास 78,000 इतकी आहे. यातून 25000 मतदार संख्या असलेले कुपवाड गावठाण आणि विस्तारित भाग हा एक स्वातंत्र्य प्रभाग होऊ शकतो.

2) भौगोलिक रचना

कुपवाडला नैसर्गिक सीमा लाभलेल्या आहेत:

पूर्वेला – मिरजेचा ओढा, कुपवाड एमआयडीसी व सावळी गावाची हद्द.

उत्तरेला – बामणोली, कवलापूर, बुधगाव गावांच्या हद्दी.

पश्चिमेला – सूतगिरणीचे टेकड.

दक्षिणेला – पालवी हॉटेल ते गोदरेज चौक.

या भौगोलिक सीमांच्या आधारे स्वतंत्र प्रभाग अस्तित्वात आणणे शक्य आहे व तो कुपवाडकर नागरिकांना अधिक सोयीचा ठरेल.

---

3) प्रशासकीय सुलभता

प्रभाग क्रमांक 2 हा जवळपास 1100 हेक्टर इतका विशाल आहे.

पूर्व ते पश्चिम अंतर सुमारे 8 किलोमीटर आहे (उदा. पुष्पराज चौक ते गांधी चौक, मिरज हे अंतरही साधारण 8 किलोमीटर आहे).

या प्रभागात 558 हेक्टर कुपवाड व 545 हेक्टर मिरजचा समावेश आहे.

यातील 126 हेक्टर कुपवाड व 118 हेक्टर मिरज हा शेतजमिनीचा भाग असून येथे लोकसंख्या अत्यंत तुरळक आहे.

या सर्व बाबींचा विचार करता, कुपवाडला न विभागता स्वतंत्र प्रभाग घोषित करणे तर्कसंगत, सोयीचे व प्रशासकीय दृष्ट्या सुलभ ठरेल.

4) विधानसभेतील विभागणी

कुपवाड गाव विधानसभेच्या वेळी देखील दोन विधानसभांमध्ये विभागले जाते. भविष्यातील सोयीसाठी व नागरिकांच्या हितासाठी कुपवाड गावठाण व विस्तारित भाग एकत्र ठेवून स्वतंत्र प्रभाग निर्माण करणे आवश्यक आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या