स्वारातीम विद्यापीठाच्या २० डिसेंबरच्या परीक्षा पुढे ढकलल्या;सुधारित वेळापत्रक विद्यापीठ संकेतस्थळावर जाहीर

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 13/12/2025 6:14 PM

नांदेड :- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या हिवाळी २०२५ पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षा सध्या सुरू आहेत. दरम्यान, दि.२० डिसेंबर, २०२५ रोजी होणाऱ्या नगरपरिषद व नगरपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकांमुळे त्या दिवशी आयोजित करण्यात आलेल्या विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या पुढे ढकललेल्या परीक्षा संबंधित अभ्यासक्रमांच्या शेवटच्या दिवशी घेण्यात येणार असल्याचे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने स्पष्ट केले आहे.
सुधारित वेळापत्रकानुसार, दि. २० डिसेंबर रोजी होणाऱ्या बी.व्होक (पीएसएसडी), बी.व्होक (एमएलटी), एम.लिब (न्यू व रिव्हाइज्ड) या अभ्यासक्रमांच्या परीक्षा आता २२ डिसेंबर, २०२५ रोजी आयोजित करण्यात येणार आहेत. तसेच एल.एल.एम. प्रथम वर्ष व एम.पी.एड. द्वितीय वर्ष या अभ्यासक्रमांच्या परीक्षा २३ डिसेंबर, २०२५ रोजी होतील.                                                                                   बी.व्होक सीएमई, बी. व्होक बी.एफ.एस.आय., बी.एस्सी. जनरल, बी.एड. प्रथम वर्ष, बी.पी.एड. प्रथम वर्ष, एम.एड. एम.लिब व एम.पी.एड. प्रथम वर्ष या अभ्यासक्रमांच्या परीक्षा २४ डिसेंबर २०२५ रोजी पार पडणार आहेत.
एम.कॉम (जनरल), एम.कॉम (बँकिंग अँड इन्शुरन्स), एम.जे., एम.ए., एम.एस.डब्ल्यू. व एम.व्होक एफ.टी.
या अभ्यासक्रमांच्या परीक्षा २६ डिसेंबर २०२५ रोजी घेण्यात येतील. याचप्रमाणे एम.एस्सी. जनरल (एनईपी), एम.एस्सी.
जनरल (सीबीसीएस), एम.एस्सी. एसई (सीबीसीएस) एम.एस्सी. सीएम (सीबीसीएस), एमसीए द्वितीय वर्ष व बी.ए. एल.एल.बी./ एल.एल.बी. द्वितीय वर्ष या अभ्यासक्रमांच्या परीक्षा २७ डिसेंबर २०२५ रोजी होतील. एम.जे. (न्यू) या अभ्यासक्रमाची परीक्षा २९ डिसेंबर, तर एम.जे. (रिव्हाइज्ड) ची परीक्षा ३१ डिसेंबर, २०२५ रोजी पार पडणार आहे. तसेच बीबीए व बीबीए (एबीएम) या अभ्यासक्रमांच्या परीक्षा ३ जानेवारी, २०२६ रोजी आयोजित करण्यात आल्या आहेत.
या सुधारित वेळापत्रकाची सर्व संबंधित विद्यार्थ्यांनी व महाविद्यालयांनी नोंद घ्यावी. तसेच सविस्तर माहितीसाठी विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक हुशारसिंग साबळे यांनी केले आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या