नांदेड :-अमृत संस्था आणि एमसीईडी यांच्या संयुक्त विद्यमाने नांदेड येथील शासकीय आयटीआय नुकताच सोलार देखभाल व दुरुस्ती अमृत सुर्यमित्र या 18 दिवसीय निवासी प्रशिक्षणाचा उत्साहपूर्ण शुभारंभ झाला. उद्घाटन प्रसंगी अमृत संस्थेचे विभागीय व्यवस्थापक ओंकार शेटे यांनी सोलार तंत्रज्ञान क्षेत्रातील वाढत्या रोजगार संधीचा वेध घेत युवकांना कौशल्यविकास व स्वावलंबनाचा संदेश दिला. जिल्हा व्यवस्थापक सौरभ कुलकर्णी यांनी प्रशिक्षणाच्या माध्यमातून नव्या तांत्रिक क्षेत्रात स्वत:ची भूमिका मजबूत करण्याचे आवाहन केले. एमसीईडीचे राज्य समन्वयक श्रीकांत कुलकर्णी यांनी आभासी माध्यमातून प्रेरणादायी मार्गदर्शन करत उद्योजकता विकास व सोलार उद्योगातील वाढत्या संधीबाबत समव्यापक माहिती दिली. मान्यवरांनी उद्योजकता, कौशल्यवृध्दी आणि रोजगारनिर्मिती या महत्वाच्या विषयावर मार्गदर्शन करत प्रशिक्षण कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन केले. यावेळी अमृत संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक सौरभ कुलकर्णी, जिल्हा उपव्यवस्थापक विश्वेश्वर जोशी, अमृत सखी मनीषा कुणसावळीकर, अमृत मित्र प्रशांत कापसे आणि एमसीईडी जिल्हा प्रकल्प अधिकारी शंकर पवार, विश्वजीत कांबळे तसेच शासकीय आयटीआयचे प्राचार्य, प्राध्यापक, आणि प्रशिक्षणार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.