.सांगली: आज राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष्याच्या अल्पसंख्याक सेल सांगली शहर-जिल्हा यांची बैठक यशस्वी रित्या पार पडली.
आगामी महापालिका निवडणुकांसाठी रणनीती आखण्यासाठी, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष माजी जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली , शहजिल्हाध्यक्ष संजयजी बजाज यांच्या सूचनेनुसार पक्ष व प्रदेश निरीक्षक शेखर माने यांच्या प्रमुख उपस्थिती अल्पसंख्याक सेल ची शहरजिल्हा कार्यकारिणीची बैठक पार पडली
बैठकीचे स्वागत व प्रास्ताविक अल्पसंख्याक सेल चे जिल्हाध्यक्ष आयुब बारगिर यांनी केले
यावेळी प्रदेश निरीक्षक शेखर माने म्हणाले की , पक्षाने सर्व समाजघटकांना सोबत घेऊन निवडणूक लढवण्याचा निर्धार केला. विशेषतः अल्पसंख्याक समाजाच्या आर्थिक, शैक्षणिक आणि व्यवसायिक प्रगतीसाठी पक्ष सातत्याने त्यांच्या मागे ठामपणे उभा राहील, असे ठरवण्यात आले.
सदर बैठकीचे आभार पक्षाचे मुख्य सचिव डॉ शुभम जाधव यांनी मानले
या प्रसंगी अल्पसंख्याक सेल चे जिल्हाध्यक्ष आयुब बारगीर, माजी नगरसेवक हरिदास पाटील, विधानसभा अध्यक्ष सचिन जगदाळे , कार्याध्यक्ष इर्शाद पखाली, आयेशा शेख, अजीम मुल्ला, वाजीद खतीब , शहारुख सनदी , राहील मुल्ला, सरफराज शेख ,अंजर फकीर ,अजहर सय्यद , शाहरुख शेख ,संजीव कांबळे ,असलम मुल्ला , साहिल मुजावर ,वसीम बलंबड , रेहान समलेवाले यांच्या अल्पसंख्याक सेलचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
सर्व पदाधिकाऱ्यांनी आपल्या भागात पक्षाचा प्रचार अधिक जोमाने करण्याचे आणि समाजापर्यंत पक्षाचे धोरण पोहोचवण्याचे ठरवले.