आरटी आय न्यूज नेटवर्क
(विजय जगदाळे)
वडूज दि:कलेढोण येथील दोन समाजातील गटांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला अंतर्गत वाद अखेर पोलिसांच्या तत्पर आणि समन्वयपूर्ण भूमिकेमुळे शांततेत मिटविण्यात यश आले.यावेळी वडूज पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक घनश्याम सोनवणे, सहायक पोलिस निरीक्षक विक्रांत पाटील यांनी दोन्ही गटातील युवकांशी संवाद घडवून आणल्याने संभाव्य अनुचित प्रकार टळला.
मिळालेल्या माहितीनुसार आर्थिक व्यवहार पूर्ण न केल्याचा रागा पोटी काही युवकांनी संबंधिताची जनावरे चोरी केली व यातून झालेली मारहाण अन् गुन्हा नोंद झाल्याने या वादास सुरुवात झाली होती.जनावरे चोरी मध्ये सहभागी असणाऱ्या या युवकांनी सबंधित व्यक्तीच्या घरातील काही युवकांना मारहाण केल्याची घटना घडली याप्रकरणी परस्पर विरोधी गुन्हा नोंद करण्यात आला . तद्नंतर पुन्हा दोन्ही गटात किरकोळ मारहाणीचा प्रकार घडला याच
जुन्या वादातून एकमेकांना खुन्नस व समाज माध्यमावर आव्हानातम्क स्टेटस ठेवल्याने या दोन्ही समाजामधील युवकांचा वाद शिगेला पोहचला होता. यातून पुन्हा अनुचित प्रकार घडणार असल्याची कुणकुण पोलिस प्रशासनास लागताच व सबंधित घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी वेळेवर हस्तक्षेप करत दोन्ही गटांमध्ये मायणी पोलिस स्टेशन येथे संवाद घडवून आणला. यावेळी पोलिस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी दोन्ही गटातील युवकाना कायद्यात रहाल तर फायद्यात रहाल असे स्पष्टपणे सांगत कायदेशीर बाबी बाबत मार्गदर्शन करून गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याचे आयुष्यभर भोगावे लागणारे परिणाम याची गंभीरतेने जाणीव देखील करून दिली. स्वतःच्या व गावाच्या हितासाठी शांतता- एकोपा अबाधित राखण्याच्या सूचना युवकांना केल्या. युवकांनी त्यांची शक्ती - ऊर्जा विघातक कामासाठी न वापरता विधायक कामासाठी वापरावी. कलेढोण हे गाव माजी मुख्यमंत्री महोदयांचे , प्राध्यापक शिवाजीराव भोसले, द्राक्ष बागायतदार, गालाई कामगारांचे कष्टकऱ्यांचे गाव असल्याने त्याचा लौकिक आहे. त्या लौकिकास बाधा पोहोचेल असे अंध वर्तन करू नये. चांगल्या गोष्टी करण्यास खूप वेळ लागतो. चांगले म्हणून घेण्यास खूप वेळ लागतो वाईट म्हणून घेण्यास एक क्षण ही पुरे असतो.क्षमा वीरश्य भूषणम असते. संयम ठेवायला ताकद लागते विवेकी पणा लागतो भांडण करण्यासाठी नाही. तरुणाने एकत्र येऊन वृक्षारोपण, व्यसनमुक्ती, ग्रामस्वच्छता यासारख्या ग्राम व समाज हिताचे आदर्श उपक्रम हाती घेऊन पूर्णत्वास न्यावेत. पोलीस मित्र म्हणून काम करावे. व इतर गावांना आदर्श घालून द्यावा. स्टेटस ठेवणे. एक दुसऱ्याकडे खुन्नस ने पाहणे व त्यातून एकमेका सोबत भांडण करणे या शूद्र मानसिकतेमुळे प्रगती न होता अधोगती होणार आहे. त्यामुळे अशा कुविचारसरणीला थारा देऊ नये. सोच बदलो सितारे बदल जायेंगे. वाल्याचा वाल्मिकी झाला तर तुम्ही का बदलू शकत नाहीत. मी तुम्हाला आता समज, चेतवानी देत आहे. यानंतर जर भांडणे केले तर आम्ही बेरहमपणे कायदेशीर कठोर परिणामकारक आणि प्रभावी कारवाई करू असा सज्जड दम देखील दिला. गावातील किरकोळ तंटे गावातच मिटवा, थोर पुरुषांचे विचार अंगी करा, तुम्ही चांगले वागलात तर येणारी नवीन पिढी देखील चांगली वाघेल, पाचामुखी परमेश्वर या उक्तीप्रमाणे गावातील तंटामुक्त समितीच्या पदाधिकाऱ्यांचा मान ठेवा त्यांचे ऐका. पोलीस आणि न्यायालयीन प्रक्रियेत जाणारा वेळ पैसा आणि सर्व प्रकारचा त्रास टाळा. नोकरी करणारे किंवा त्याही पुढे जाऊन नोकरी देणारे व्हा. शून्यातून विश्व निर्माण करा. एकीचे बळ मिळते फळ. चांगल्या गोष्टीसाठी पुढे येऊन लीडर बना. परिवर्तनाची सुरुवात स्वतःपासून करा. जातीभेदाला तीलांजली द्या. माणूस जातीने नव्हे तर कर्माने मोठा होतो. जातीभेदाला, धर्म भेदाला मूठ माती तुमच्यासारखे तरुण नाही देणार तर कोण देणार? जात मानवाने निर्माण केली आहे मानव जात सर्वश्रेष्ठ जात असून त्याबाबत सम्यक दृष्टिकोन कायम बाळगावा यावेळी बीट अंमलदार नाना कारंडे पोलिस पाटील सचिन शेटे यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली.यावेळी अजयशेठ जाधव,प्रवीण बुधावले, पत्रकार बांधव उपस्थित होते.दोन्ही समाजातील पारंपारिक व जुना वाद सामंजस्याने मिटवल्याने पोलिस प्रशासनाचे समाज माध्यमातून कौतुक होत आहे.
फोटो: नाईक व मातंग समाजातील युवकांसह पोलिस निरीक्षक घनश्याम सोनवणे व सहाय्यक पोलिस विक्रांत पाटील व इतर