शीख धर्माचे श्री गुरु तेग बहादुर यांच्या साडेतीनशेव्या शहीदी समागम कार्यक्रमासाठी साताऱ्यात तयारी ..

  • विजय जगदाळे (Pingali)
  • Upadted: 18/01/2026 1:17 PM



आरटी आय न्यूज नेटवर्क 
(विजय जगदाळे)

सातारा दि: मानवी कल्याणासाठी झटणाऱ्या युगपुरुष व गुरुजनांना वंदन करण्याची परंपरा जोपासणारी पवित्र भूमी म्हणजे सातारा भूमी. याच भूमीत आता शीख धर्माचे नववे गुरु श्री गुरु तेग बहादुर यांच्या साडेतीनशे व्या शहीदी समागमाच्या कार्यक्रमासाठी साताऱ्यात जोरदार तयारी सुरू झालेली आहे. साताऱ्यातील गुरुद्वारामध्ये हा सोहळा साजरा करण्यात येणार असून महाराष्ट्र शासनानेही यामध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे.

श्री गुरु तेग बहादुर (एप्रिल १६२१ - नोव्हेंबर १६७५) हे शीख धर्माचे नववे गुरु होते. त्यांचा जन्म अमृतसर (पंजाब) येथे झाला. श्री गुरू तेग बहादुर यांनी आध्यात्मिक व सांस्कृतिक इतिहासात धर्मस्वातंत्र्य, मानवता आणि सत्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यांच्या ३५० व्या शहिदी समागमाच्या निमित्ताने महाराष्ट्र शासनाने भव्य कार्यक्रमाचे आयोजन
केले आहे. यासाठी राज्य शासनाने राज्यस्तरीय आणि विभागस्तरीय तसेच
जिल्हास्तरीय समिती स्थापन केली आहे. सातारा जिल्ह्यातही स्थापन समितीमार्फत शीख बांधवांसोबत इतर जाती धर्मातील लोकही सहभागी होत आहेत.

या समागमातील विविध धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रम हे केवळ स्मरणोत्सव नसून, मूल्याधिष्ठित राष्ट्रनिर्मितीचा संदेश देणारे ऐतिहासिक पर्व ठरेल, असा विश्वास ज्येष्ठ पत्रकार तथा दैनिक सांजवात संपादक घनश्याम छाबडा यांच्यासह सातारा जिल्ह्यात वास्तव करणाऱ्या अनेक शिख बांधवांनी व्यक्त केला आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या