सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका निवडणूक २०२६ मध्ये विजय संपादन केलेले काँग्रेसचे सर्व नगरसेवक व नगरसेविका लोकतीर्थ स्मारक स्थळी स्व. डॉ. पतंगराव कदम साहेबांच्या स्मृतीस अभिवादन करण्यास आले असता सर्वांचे स्वागत केले. याप्रसंगी सर्व नवनिर्वाचित नगरसेवक व नगरसेविका यांचा यथोचित सत्कार करीत पुढील वाटचालीस सदिच्छा दिल्या.
स्व. डॉ. पतंगराव कदम साहेबांनी लोककल्याण, सामाजिक न्याय आणि सर्वसमावेशक विकासाच्या विचारांतून केलेले कार्य स्मरणात ठेवून पुढील मार्गक्रमण करण्यास प्राधान्य द्या. लोकहित हेच सर्वस्व मानून काम करा. निधीची कमतरता कधीच पडू दिली जाणार नाही हा माझा शब्द आहे. तिन्ही शहराच्या सर्वांगीण विकासासाठी, जनतेच्या अपेक्षांना न्याय देत प्रामाणिक व प्रभावी काम करा नेहमीच सहकार्य राहील अशी ग्वाही यावेळी सर्वांना आ. विश्वजीत कदम यांनी दिली.