भगूर नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी प्रसाद आडके यांची बिनविरोध निवड
भगूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी प्रसाद आडके यांची बिनविरोध निवड करण्यात आली तसेच नामनिर्देशित सदस्यपदी आघाडीच्या वतीने भाजपाचे श्री मृत्युंजय कापसे व शिवसेना शिंदे गटाच्या वतीने श्री फरीद शेख यांची निवड करण्यात आली
भगूर नगरपरिषदेच्या पहिली सर्वसाधारण सभेत उपनगराध्यक्ष व नामनिर्देशित सदस्यांची निवड करण्यात आली .
सदर सर्वसाधारण सभेसाठी पीठासीन अधिकारी मा.सौ.प्रेरणा विशाल बलकवडे व मुख्याधिकारी डॉ.सचिनकुमार पटेल यांनी सर्व उपस्थित नगरसेवक /नगरसेविका यांचे स्वागत केले व पीठासीन अधिकारी यांनी उपाध्यक्ष पदाची निवडणूक व नामनिर्देशन सदस्यांचे नामनिर्देशन करणे या प्रक्रियेची माहिती उपस्थित सदस्यांना देण्यात आली .
उपाध्यक्ष पदासाठी एकच श्री प्रसाद अंबादास आडके यांचे नामनिर्देशन पत्र प्राप्त झाल्याने व शिवसेना गटाचे नेते श्री शंकर किसन करंजकर यांनी आमचा उमेदवारास विरोध नसल्याचे स्पष्ट केल्याने महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नागरी सुधारणा अधिनियम 2016 च्या आदेशानुसार व नियमांचे वेळोवेळी झालेल्या सुधारणा नुसार माननीय पिठासीन अधिकारी सौ .प्रेरणा विशाल बलकवडे यांनी श्री प्रसाद अंबादास अडके हे भगूर नगर परिषदेच्या उपाध्यक्ष पदावर बिनविरोध निवडून आल्याचे जाहीर केले .
पिठासीन अधिकारी नगराध्यक्ष सौ प्रेरणाताई विशाल बलकवडे यांनी दोन सदस्यांची नामनिर्देशित सदस्य यांची नावे जाहीर केली,
सदर निवड भारतीय जनता पार्टी ,राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना (उबाठा) या गटातर्फे गटनेता सौ प्रेरणा विशाल बलकवडे यांनी माननीय जिल्हाधिकारी नाशिक यांच्याकडे श्री मृत्युंजय दिनेश कापसे यांच्या नावाची लेखी शिफारस केली तसेच शिवसेना या गटातर्फे गटनेता श्री शंकर किसनराव करंजकर यांनी श्री शेख फरीद बाबू यांच्या नावाची लेखी शिफारस जिल्हाधिकारी यांच्याकडे केली सदरील नामनिर्देशन पत्र व अहर्ता संदर्भात छाननी पद निर्देशित अधिकारी माननीय जिल्हाधिकारी नाशिक यांनी केल्यानुसार वैध नामनिर्देशन पत्र नगराध्यक्ष यांच्याकडे पुढील कार्यवाही साठी अग्रेषित केलेली असल्याने मग संबंधित गटास प्राप्त तौलनिक संख्या बळानुसार आवश्यक तेवढे नाम निर्देशन स्वीकारले व त्यानुसारश्री.मृत्युंजय दिनेश कापसे व श्री शेख फरीद बाबू यांची भगूर नगर परिषदेवर नामनिर्देशित सदस्य म्हणून निवड पीठासीन अधिकारी सौ.प्रेरणा विशाल बलकवडे यांनी घोषित केले .पीठासीन अधिकारी व मुख्याधिकारी डॉ.सचिनकुमार पटेल नूतन उपनगराध्यक्ष व निर्वाची तसेच नामनिर्देशित सदस्यांचे अभिनंदन केले .
सदर कामकाजासाठी मुख्याधिकारी डॉ.सचिनकुमार पटेल नगर अभियंता सिद्धेश्वर मुळे, स्वप्निल मोकळ पाणीपुरवठा अभियंता, रोशन उगले सहाय्यक नगर रचनाकार, गीतांजली मराडे आस्थापना प्रमुख, सोनाली शिरसाट कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी,सोमनाथ देवकाते लेखापाल, पुनम गवळी, शशांक तिवडे नगरपरिषद अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते . सर्व निवड झालेल्या उमेदवारांचे कार्यकर्त्यांच्या वतीने जल्लोषात स्वागत करण्यात आले