दिनांक :- 15/02/2026
---------------------------
जेऊर ता.जि. अहिल्यानगर येथे कत्तल करण्यासाठी डांबुन ठेवलेले 6 गोवंशीय जनावरांची सुटका, आरोपींकडुन 1,30,000/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त, स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांची कारवाई.
---------------------------
मा. श्री सोमनाथ घार्गे साहेब, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये गोवंशीय जनावरांची कत्तल करणारे ठिकाणांची व कत्तलीसाठी चालविलेल्या गोवंशीय जनावरांची सुटका करुन आरोपीविरुध्द कारवाई करणेबाबत आदेश दिलेले आहेत.
सदर आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री किरणकुमार कबाडी यांचे नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेतील पोउपनि/महादेव गुट्टे, पोलीस अंमलदार अतुल लोटके, गणेश धोत्रे, शाहिद शेख, सुनिल पवार, चालक भगवान धुळे यांचे पथक तयार करुन सदर पथकास एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन हद्दीते गोवंशीय जनावरांची कत्तल करणारे इसमांची माहिती काढुन कारवाई करणेबाबत सुचना व मार्गदर्शन करुन पथकास रवाना केले.
वर नमुद पथक दिनांक 14/02/2026 रोजी रात्री एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन हद्दीत कत्तलखान्याची माहिती काढत असतांना पथकास गुप्त बातमीदारामार्फत अहिल्यानगर ते संभाजीनगर रोडलगत जेऊर गावात पार्थ ढाब्याचे पुर्व बाजुस शेतात पत्र्याच्या खोलीमध्ये एक इसम गोवंशीय जातीचे जणावरे कत्तल करणे कामी घेवुन येवुन त्यांना निर्यदयतेने डांबुन ठेवुन असल्याची माहिती प्राप्त झाली. सदर माहितीप्रमाणे पथकाने तात्काळ बातमीतील ठिकाणी जावुन खात्री केली असता सदर ठिकाणी पत्र्याच्या खोलीमध्ये एक इसम हा शासनाने विक्री व कत्तल करण्यास प्रतिबंध केलेले गोवंशीय जातीचे जणावरे कत्तल करणे कामी घेवुन येवुन त्यांना चारा पाण्याची कुठलीही सोई सुविधा न करत निर्यदयतेने डांबुन ठेवल्याचे दिसुन आले. पथकाने सदर छापा टाकुन सदर ठिकाणी असलेल्या इसमांना ताब्यात घेवुन त्यांना त्यांचे नांव गांव विचारता त्यांनी त्यांची नावे 1) अबरार अमिन शेख वय- 57 वर्षे रा. कसाबवाडा बायजाबाई जेऊर अहिल्यानगर असे असल्याचे सांगितले.
ताब्यातील इसमाकडुन 1,30,000/- रुपये किमतीचे 6 गोवंशीय जनावरे, एकुण 1,30,000/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
आरोपीविरुध्द एम.आय.डी.सी पोलीस ठाणे गु.र.नं. 116/2026 महाराष्ट्र पशुसंवर्धन अधिनियम 1976 चे कलम 11(1)(ई)(ड) सह प्राण्यांचा छळ प्रतिबंध अधिनियम 1960 चे कलम 5,9 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन करीत आहे.
सदरची कारवाई मा. श्री. सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर, यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.