महात्मा बसवेश्वर अध्यासन केंद्र चालु करण्याची शिवा संघटनेची मागणी

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 14/02/2026 7:28 PM

नांदेड :- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथे महात्मा बसवेश्वर यांचे अध्यासन केंद्र स्थापन करून सुरू करणे याबाबचे  निवेदन राज्याचे मुख्यमंत्री व उच्च शिक्षण मंत्री यांना मंत्रालयामध्ये शिवा संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे सरांनी प्रत्यक्ष भेटून निवेदन सादर केले.त्याचाच एक भाग म्हणुन स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांना  शिवा कर्मचारी महासंघाचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष विठ्ठलराव ताकबिडे, शिवा कर्मचारी महासंघाचे राज्य सरचिटणीस संजय कोठाळे ,, शिवा संघटनेचे नांदेड जिल्हा संपर्कप्रमुख इंजि. अनिल माळगे.शिवा कर्मचारी महासंघाचे मराठवाडा संघटक डॉ. वैजनाथ हंगरगे, शिवा संघटनेचे नांदेड जिल्हा प्रमुख विलास कापसे,.शिवा कर्मचारी महासंघाचे  तालुकाध्यक्ष, दिपक गाढवे स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठातील प्रोफेसर.प्रा.संतोष बुटले लोणकर यांनी प्रत्यक्ष भेटून निवेदन देण्यात आले.बाराव्या शतकात समतेचा संदेश देणारे, लोकशाही चे उद्‌गाते क्रांती सूर्य जगद् ज्योती महात्मा बसवेश्वर यांचे अध्यासन केंद्र होणे गरजेचे आहे यावर चर्चा झाली. त्यास कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी सकारात्मक प्रतिसाद देत महात्मा बसवेश्वर अध्यासन केंद्राचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येईल व त्याचा पाठपुरावा करण्यात येईल असे आश्वासन दिले.

Share

Other News

ताज्या बातम्या