पलूसचा खेळाडू दीप जाधव याची १४ वर्षाखालील वेस्ट झोन क्रिकेट कॅम्प साठी निवड

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 13/02/2026 2:05 PM

सांगली:  विजय वावरे क्रिकेट अकॅडमी चा खेळाडू दीप जाधव याने अहमदाबाद येथे झालेल्या १४ वर्षाखालील वेस्ट झोन क्रिकेट स्पर्धेमध्ये ३०० धावा तसेच ९ बळी घेतले होते. त्यात त्याने मुंबई संघाविरुद्ध १३५ धावांची खेळी केली होती.
 या कामगिरीच्या जोरावर त्याची अहमदाबाद येथे होणाऱ्या वेस्ट झोन क्रिकेट कॅम्प साठी निवड झाली.

दीप जाधव चे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार माननीय संजय बजाज यांनी विशेष कौतुक केले

 दीप जाधव ला महाराष्ट्र टूर्नामेंट कमिटीचे सदस्य निलेश शहा, ज्येष्ठ प्रशिक्षक सागर पेंडूरकर व पोलाईट क्रिकेट क्लब चे मार्गदर्शन लाभत आहे.
 
दीप जाधव हा बीसीसीआय लेव्हल १ क्रिकेट प्रशिक्षक विजय वावरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली पलूस व भिलवडी येथे क्रिकेटचा कसून सराव करत आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या