सांगली भाजपकडून काँग्रेस भवनसमोर तीव्र आंदोलन

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 15/02/2026 6:15 PM

शिवरायांचा अपमान सहन केला जाणार नाही..!!

आज सांगली येथे भारतीय जनता पार्टी सांगली शहर जिल्ह्याच्या वतीने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ काँग्रेस भवनसमोर तीव्र आंदोलन करण्यात आले.

छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांची तुलना करून महाराष्ट्राच्या अस्मितेला ठेच पोहोचवणारे विधान केल्याचा आरोप करत भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

छत्रपती शिवाजी महाराज हे स्वराज्याचे संस्थापक आणि रयतेचे रक्षक आहेत. त्यांच्या कार्याची तुलना कोणाशीही करणे हा महाराष्ट्राच्या भावना दुखावणारा प्रकार आहे. काँग्रेसने या प्रकरणी तात्काळ कारवाई करावी.

यावेळी भाजपा सांगली शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, प्रदेश कार्यकारणी सदस्य पांडुरंग कोरे, महिला मोर्चा प्रदेश सचिव ज्योतीताई कांबळे, जिल्हा सरचिटणीस विशाल पवार, विश्वजीत पाटील, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख केदार खाडिलकर, ज्येष्ठ नेते श्रीकांत शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष हेमलताताई मोरे,श्रीकांत वाघमोडे,
जिल्हा सचिव उदय मुळे, नगरसेवक मोहन वाटवे, संजय यमगर, उदय बेलवलकर, दीपक वायदंडे, योगिताताई राठोड, मीनाक्षीताई पाटील, प्रकाश पाटील, रवींद्र सदामते, अतुल माने, गीताताई पवार, वैशालीताई गवळी, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष शांतिनाथ कर्वे, मंडलाध्यक्ष रवींद्र वादवणे, अमित देसाई, कृष्णा राठोड, माजी नगरसेवक मनोज सरगर, सुजित राऊत  पृथ्वीराज पाटील, भूपाल सरगर, रघुनाथ सरगर, शुभम देसाई, सुमित शिंदे, मिलिंद भिडे, गजानन नलवडे, मनीष देशपांडे, दरिबा बंडगर आदी पदाधिकारी  व कार्यकर्ते उपस्थित होते .

Share

Other News

ताज्या बातम्या