सांगली पेठ रस्त्यावर कसबे डिग्रज हद्दीमध्ये एक किलोमीटरचा रस्ता अर्धवट अवस्थेत राहिला आहे त्याबाबत न्यायालयात काही शेतकरी गेले आहेत आम्ही सुद्धा मा न्यायालयाला पत्र व्यवहार केला होता व जलद गतीने सुनावणी घेऊन सदर प्रकरणात निकाल द्यावा अशी विनंती केली होती त्यानुसार सुनावणी सुरूच आहे.
मात्र न्यायालयात गेलेल्या स्थानिक शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार सदर ठिकाणी रस्ता 15 मीटर असून उर्वरित रस्त्याचे भूमी संपादन करायला हवे मात्र भूमी संपादन कार्यालयाकडून 1879 व 1970 ते 73 या काळात सदर रस्ता 21 ते 24 मीटर रुंद असलेले पुरावे सादर केलेले आहेत.
स्थानिक लोकप्रतिनिधी असतील जिल्हा प्रशासन असेल याबाबत जागेवर जाऊन निर्णय घेऊन काम का पूर्ण करत नाहीत याचे मूळ कारण काय आहे हे कळत नाही
जिल्हा प्रशासनाची जागतिक पातळीवर दखल घेतली जात असताना दुसऱ्या बाजूला 50 किलोमीटर रस्त्यामधील एक किलोमीटर रस्ता अर्धवट अवस्थेत राहिल्यामुळे रोज अपघात घडत आहेत याला जबाबदार कोण??
माननीय जिल्हाधिकारी असतील जिल्हा प्रमुख प्रमुख असतील स्थानिक लोकप्रतिनिधी असतील यांनी याबाबत तात्काळ तोडगा काढून सदर अर्धवट अवस्थेत असलेला रस्ता पूर्ण करावा अशी विनंती आहे.
अन्यथा आम्हाला वेगळ्या पद्धतीने आंदोलन करावे लागेल याची दाखल सर्वच जिल्हा प्रशासन व पालकमंत्री व लोकप्रतिनिधी यांनी घ्यावी.
सतीश साखळकर,
नागरिक जागृती मंच सांगली जिल्हा.