मराठा क्रांती मोर्चा सांगली यांच्या माध्यमातून साजरा होणारा शिवजन्मोत्सव सोहळा हजारो महिला व नागरिकांच्या उपस्थित उत्साही वातावरणात जल्लोषात साजरा करण्यात आला.
यावेळी मर्दानी खेळाची प्रत्याषिके,सह्याद्रीचा सिंह गर्जतो हा शाहिरी पोवाडा कार्यक्रम व शिवजन्मोत्सव पाळणा इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.महापौर धिरज सूर्यवंशी यांच्या हस्ते महाराजांना हार घालण्यात आला यावेळी फटाक्यांची भव्य आतषबाजी करण्यात आली व मिठाई वाटप करण्यात आले.
मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने नेहमी प्रमाणे स्टेज उभारणी,विद्युत रोषणाई,साउंड सिस्टम व भव्य स्क्रीनच्या माध्यमातून शिवाजी महाराजांचे अनेक पैलू उघडण्याचा प्रयत्न केला आहे.