सहकार ग्रुपचे संस्थापक पैलवान रणजीत चव्हाण यांच्या पुढाकाराने शिवजयंती महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला एमआयडीसी पोलीस सहा निरीक्षक मा. घाडगे साहेब प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमानंतर गुंठेवारी भवन येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आले. या वेळी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. शिवाजी महाराजांच्या आदर्शांचे स्मरण करून समाजातील ऐक्य, शौर्य आणि प्रेरणेचा संदेश देण्यात आला.
याप्रसंगी जय हिंद सेना पक्षप्रमुख चंदनदादा चव्हाण, समाजवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष नितीन मिरजकर शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुतार, भोसे पंचायत समितीचे युवा नेते वैभव दादा चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. शेवटी ऍड. अभिजीत खोत यांनी आभार मानले.