दिव्यांग कल्याण विभागाच्या ‘दिव्यांग सहाय्यक पोर्टल’चे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री अतुल सावे, मुख्य सचिव राजेश अग्रवाल आणि दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे उपस्थित होते.
#दिव्यांग व्यक्तींना शासकीय योजनांचा लाभ सुलभ, पारदर्शक आणि वेळेत मिळावा, यासाठी दिव्यांग कल्याण विभागाने #दिव्यांगसहाय्यकपोर्टल हे एकात्मिक ऑनलाइन पोर्टल आणि मोबाईल ॲप विकसित केले आहे. यामुळे सेवा वितरणाला #डिजिटल गती मिळणार असून दिव्यांगांच्या सेवा वितरण अधिक सुलभ व पारदर्शक होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
यावेळी ‘दिव्यांग सहाय्यक पोर्टल’ https://divyangsahayakportal.maharashtra.gov.in आणि मोबाईल ॲपचेही उद्घाटन करण्यात आले.