नांदेड :- नांदेड जिल्हयातील बेरोजगार उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी, यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व वीर माधवराव नळगे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, लोहा यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार 25 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजेपासून वीर माधवराव नळगे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, लोहा येथे पंडीत दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या रोजगार मेळाव्यामध्ये नामांकित उद्योजक तसेच शाळा व महाविद्यालय तसेच इतर खाजगी आस्थापनांमध्ये रोजगार व नोकरीच्या संधीसाठी मुलाखती घेण्यात येणार आहेत. नांदेड जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांनी बुधवार 25 फेब्रुवारी 2026 रोजी रोजगार मेळाव्यास उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त डॉ.रा.म. कोल्हे यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र , आनंदनगर रोड, बाबा नगर नांदेड कार्यालयाचा ई-मेल आयडी nandedrojgar01@gmail.com आणि कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक 02462-251674 यावर संपर्क साधावा, असेही आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्यावतीने करण्यात आले आहे.