राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंतीनिमित्त महापोरांनी राबविली स्वच्छता मोहीम

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 24/02/2026 9:08 AM

नांदेड,२३ : "स्वच्छता हाच खरा देव" असा संदेश देणारे थोर समाजसुधारक *राष्ट्रसंत गाडगे महाराज* यांच्या जयंतीनिमित्त आज, २३ फेब्रुवारी २०२६ रोजी नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या *महापौर सौ. कविता संतोष मुळे* यांच्या वतीने शहरातील चैतन्य नगर परिसरात व्यापक स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. नांदेड महानगरपालिकेच्या वतीने आयोजित या मोहिमेचे नेतृत्व माननीय महापौरांनी केले.

महापौरांनी स्वतः हातात झाडू घेऊन या परिसरातील प्रमुख रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता केली. याप्रसंगी 'स्वच्छता हीच खरी सेवा' हा संदेश देण्यात आला. या मोहिमेत मनपा अधिकारी, विविध विभागांचे कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. यावेळी शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी अहोरात्र कष्ट करणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांचा यावेळी महापौरांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला.

याप्रसंगी बोलताना महापौरांनी सांगितले की, "गाडगे बाबांनी आयुष्यभर स्वच्छतेचा आणि प्रबोधनाचा विचार मांडला. केवळ जयंतीपुरते मर्यादित न राहता, प्रत्येक नागरिकाने आपला परिसर स्वच्छ ठेवून खऱ्या अर्थाने बाबांना मानवंदना द्यावी." शहरातील विविध प्रभागांमध्येही नगरसेवकांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबवून साचलेला कचरा आणि नाल्यांची स्वच्छता करण्यात आली. याप्रसंगी महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांना कचरा वर्गीकरण करण्याचे आणि सार्वजनिक ठिकाणी घाण न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी महापोर प्रतिनिधी संतोष मुळे, नगरसेवक सतीश देशमुख, सहाय्यक आयुक्त मो.गुलाम सादिक  व स्वछता निरीक्षक यांची उपस्थिती होती.

Share

Other News

ताज्या बातम्या