शहरातील 273 अंगणवाड्यामध्ये बालके, गरोदर,स्तनदा माता, किशोरवयीन मुलींना पुरविल्या जातात विविध सेवा

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 13/04/2026 5:51 PM

नांदेड :- नांदेड शहर प्रकल्पांतर्गत एकूण 273 अंगणवाडी केंद्र शहरातील आर्थिक व सामाजिकदृष्टया मागासलेल्या क्षेत्रात कार्यरत आहेत. या अंगणवाडी केंद्रामार्फत 0 ते 6 वर्षे वयोगटातील बालके, गरोदर माता, स्तनदा माता व किशोरवयीन मुलींना एकूण 06 प्रकारच्या सेवा पुरविल्या जातात.

पुरक पोषण आहार, लसीकरण, आरोग्य तपासणी, अनौपचारिक पुर्व प्राथमिक शिक्षण, आरोग्य व आहार शिक्षण व संदर्भ सेवा. अंगणवाडी मार्फत 3 ते 6 वर्षे वयोगटातील बालकांना तसेच गरोदर , स्तनदा माता यांना टीएचआर THR (Take Home Ratio) दिल्या जाते. तसेच 3 ते 6 वर्षे वयोगटातील मुलांना HCM (Hot Cook Meal) गरम ताजा आहार दिल्या जातो. 

लसीकरण या सेवेअंतर्गत 0 ते 6 वयोगटातील बालके व गरोदर मातांना आरोग्य विभागाच्या मदतीने प्रत्येक महिण्यात लसीकरण करण्यात येते. दर सहा महिण्याला राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत  (RBSK) 0 ते 6 वर्षे वयोगटातील बालकांची आरोग्य तपाणी करण्यात येते. या तपासणीद्वारे अंगणवाडी कार्यक्षेत्रात असलेल्या कुपोषित बालकांची संख्या निश्चित होते. कुपोषित मुलांना NRC मध्ये दाखल करण्यात येते. तसेच अंगणवाडी मार्फत 3 ते 6 वर्षे वयोगटातील बालकांना पुर्व शालेय शिक्षण देण्यात येते. आजारी बालके, कुपोषित बालके, गरोदर माता यांना संदर्भ सेवा पुरविल्या जातात. तसेच अंगणवाड्या मधून 0 ते 6 वर्षे वयोगटाची बालके, स्तनदा माता, गरोदर माता, किशोरवयीन मुली यांच्यासाठी शासनाद्वारे दिल्या जाणाऱ्या विविध सुविधा मोफत देवून त्यांच्या विकासासाठी उपाययोजना राबविल्या जातात, अशी माहिती बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी नांदेड यांनी दिली आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या