सामाजिक समता सप्ताह अंतर्गत जेष्ठ नागरिक जनजागृती मेळावा व आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 13/04/2026 6:00 PM

नांदेड : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय विभागामार्फत 08 ते 14 एप्रिल 2026 या कालावधीत सामाजिक समता सप्ताह राबविल्या जात आहे. या समता सप्ताह अंतर्गत 13 एप्रिल 2026 रोजी सकाळी 11 वाजता संध्या छाया संचलित रुस्तुमजी मेवालाल वृद्धाश्रम मालेगाव रोड, नांदेड येथे जेष्ठ नागरिक जनजागृती मेळावा व आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. पी.डी जोशी, पाटोदेकर हे होते. तर प्रमुख पाहुण्या म्हणून वृद्धाश्रमाच्या सचिव सुरेखा पाटणे ह्या होत्या. सदरील कार्यक्रमास समाज कल्याण विभागाचे विठ्ठल बोराटे, वरिष्ठ लिपीक  कपिल जेटलावार, कनिष्ठ लिपीक, गजानन पंपटवार, तालुका समन्वय  विजय माळवतकर,  प्रमोद गायकवाड उपस्थित होते.

समाज कल्याण विभागाकडून मान्यवरांचा संविधान प्रास्ताविक उद्देशिका प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला. सदरील ज्येष्ठ नागरिक आरोग्य शिबिरास स्त्रीरोग तज्ञ डॉ. सुप्रिया गोडघासे तसेच त्वचारोग तज्ञ डॉ. अनिकेत जोशी आणि कान, नाक, घसा तज्ञ डॉ. अश्विन लव्हेकर हे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका समन्वयक गजानन पांपटवार यांनी केले.  यात ज्येष्ठ नागरिकांसाठी समाज कल्याण विभाग व शासनाच्या विविध विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या योजनांची माहिती सांगण्यात आली.  त्यानंतर वृद्धाश्रमाच्या सचिव सुरेखा पाटणे यांनी वृद्धांना दिलेल्या जाणाऱ्या सोयी सुविधा व त्यांच्या दिनचर्या बद्दल माहिती दिली.

 त्यानंतर विठ्ठल बोराटे यांनी वृद्धांना मार्गदर्शन केले. अध्यक्षीय समारोप पी.डी.जोशी पाटोदेकर यांनी तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप फटाले यांनी व आभार डॉ. सुप्रिया गोडघासे यांनी केले. कार्यक्रमानंतर लगेचच वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत वृद्धाश्रमातील वृद्धांची आरोग्य तपासणी करण्यात आली. 

आज 13 एप्रिल रोजी नांदेड येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुर्णाकृती पुतळा परिसर, अण्णाभाऊ साठे पुतळा परिसर, राजश्री शाहु महाराज पुतळा परिसर, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले पुतळा परिसर, छ.शिवाजी महाराज पुर्णाकृती पुतळा परिसर, प्रमुख रसत्यावरील मस्जिद परिसर, बौद्ध विहार अशा ठिकाणी समतादुत दिलीप सोंडारे व समतादुत शेख ईर्शाद व कार्यालयातील कर्मचारी विठ्ठल बोराटे, वरीष्ट लिपिक, कपिल जेटलावार, कनिष्ठ लिपिक श्रीमती एस के काळे, रहिम शेख ता.समन्वयक गणेश माळवदकर, गजानन पांपटवार यांनी स्व्च्छता माहीमेत सहभाग नोंदविला. सदरील कार्यक्रम सहाय्यक आयुक्त शिवानंद मीनगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.

Share

Other News

ताज्या बातम्या