नांदेड :- नांदेड जिल्हयातील अवैध व्यवसाय पुर्णतः बंद करण्यासंबंधाने ऑपरेश फ्लश ऑऊट अंतर्गत नांदेड जिल्हयातील अवैध दारू, हातभट्टी दारू निर्मिती अवैध जुगार खेळणारे व अवैध गुटखा बाळगणारे इसमां विरूध्द कारवाई करण्यासाठी मा. श्री अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी दिनांक 11.04.2026 रोजी मास रेडचे आयोजन केले होते.
सदर मास रेड कामी मा. श्री अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड यांचे मार्गदर्शनाखाली मा श्रीमती अर्चना पाटील, अपर पोलीस अधीक्षक, भोकर, मा.श्री. सुरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक, नांदेड, यांचेसह सह सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड येथील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार तसेच सर्व पोस्टे प्रभारी अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी भाग घेतला होता.
सदर मास रेड दरम्यान अवैध दारू, हातभट्टी दारू निर्मिती, जुगार खेळणारे व अवैध गुटखा बाळगणारे लोकांचे ठिकाणावर छापा टाकुन समुळ उच्चाटन करण्यासाठी राबविलेल्या मोहीमेमध्ये नांदेड जिल्हयात एकुण 60 गुन्हे दाखल करून एकुण 65 आरोपीतांवर कारवाई करत एकुण 2,32,662/-रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.