अहिल्यानगर, दि. ११ : इतर मागास बहुजन कल्याण विभाग, अहिल्यानगर यांच्या वतीने क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले यांची १९९ वी जयंती आज सहाय्यक संचालक कार्यालय, मुला-मुलींची वसतिगृहे तसेच आश्रमशाळेत अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली.
या वर्षी ११ एप्रिल २०२६ ते ११ एप्रिल २०२७ या कालावधीत महात्मा फुले यांचे २०० वे जयंती वर्ष साजरे करण्यात येत असून, त्यानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी सहाय्यक संचालक श्री. विनोद लोंढे व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या बेबीताई गायकवाड उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या प्रारंभी महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.
सहाय्यक संचालक विनोद लोंढे यांनी जयंतीनिमित्त शुभेच्छा देत महात्मा फुले यांच्या क्रांतिकारी कार्याचा आढावा घेतला. तसेच बहुजन कल्याण विभागाच्या ध्येयधोरणांबाबत व भविष्यातील कार्ययोजनेविषयी मार्गदर्शन केले.
प्रमुख पाहुण्या बेबीताई गायकवाड यांनी आपल्या प्रेरणादायी भाषणातून महात्मा फुले यांचे स्त्रीशिक्षण, सामाजिक न्याय व बहुजन उत्थान याबाबतचे विचार प्रभावीपणे मांडले.
जयंतीनिमित्त मुला-मुलींच्या वसतिगृहात तसेच आश्रमशाळेत निबंध व वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी महात्मा फुले यांच्या विचारांवर आधारित उत्कृष्ट निबंध व भाषणे सादर केली. स्पर्धेतील विजेत्यांना क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांचे समग्र वाङ्मय भेट देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचा समारोप निरीक्षक श्री. तुकाराम कातकडे यांनी केला. यावेळी सर्व उपस्थितांनी महात्मा फुले यांच्या विचारांना आचरणात आणण्याचा तसेच सामाजिक समता व बहुजन कल्याणाच्या कार्याला गती देण्याचा संकल्प केला.
या कार्यक्रमास विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
#RahuriByeElection #PublicHoliday #VotingDay #Election2026 #AhilyanagarUpdate #VoterAwareness #RightToVote #ElectionCommission #MaharashtraGovernment #RahuriNews #Democracy #HolidayNotice #VoteForIndia #मतदान_सुट्टी #राहुरी #जिल्हाधिकारी #ElectionAlert #VoterRights #GeneralAdministrationDepartment #EveryVoteCounts