हिंदू एकता आंदोलन शिवोत्सव २०२६ ची सांगता...

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 28/04/2026 11:47 AM

हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीनराजे शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हिंदू एकता आंदोलनाच्यावतीने "हिंदू एकता आंदोलन शिवोत्सव 2026" ची सांगता राजवाडा चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांची महाआरती करुन करण्यात आली. 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला भाजपा नेते Prithviraj patil बाबा व रा. स्व. संघाचे नितीनजी देशमाने यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून महाआरती करण्यात आली. 

यावेळी रक्षक गुरुकुल या पथकाने मर्दानी खेळ, तलवार दांडपट्टा तसेच लाठीकाठी चे प्रात्यक्षिके सादर केली. तसेच छत्रपती शिवरायांची महाआरती करण्यात आली. फटाक्यांची प्रचंड नेत्रदीपक आतिषबाजी करण्यात आली. यावेळी उपस्थित शिवभक्तांनी "जय भवानी, जय शिवाजी", "छत्रपती शिवाजी महाराज की जय" या शिवघोषांचा जयघोष करून  संपूर्ण परिसर दणाणून सोडला.  

रक्षक गुरूकुल शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण कुपवाड सांगली 
9022939267
8080822516


Share

Other News

ताज्या बातम्या