नांदेडमध्ये 'एचपीसीएल'चे प्रादेशिक कार्यालय अधिकाऱ्यांनी घेतली खा. अशोकराव चव्हाण यांची भेट

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 03/05/2026 7:25 PM

नांदेड: हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड या सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीच्या तेल कंपनीने नांदेडमध्ये आपले नवीन प्रादेशिक कार्यालय सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. 
या नवीन प्रादेशिक कार्यालयांतर्गत नांदेडसह लातूर, परभणी, हिंगोली, अकोला, वाशिम आणि यवतमाळ अशा एकूण ७ जिल्ह्यांचा समावेश असणार आहे. या सातही जिल्ह्यातील कंपनीचे सुमारे ३०० पेट्रोल पंप आता थेट नांदेड कार्यालयाशी जोडले जातील. यापूर्वी हे सर्व जिल्हे सोलापूर प्रादेशिक कार्यालयांतर्गत येत होते. मात्र, भौगोलिक अंतर आणि प्रशासकीय कामात येणाऱ्या अडचणी लक्षात घेता, नांदेडमध्ये स्वतंत्र कार्यालय सुरू करण्याची मागणी अनेक दिवसांपासून केली जात होती. ही मागणी आता पूर्ण झाली आहे. 
दरम्यान, एचपीसीएलचे प्रादेशिक व्यवस्थापक संतोष कुमार आणि क्षेत्र विक्री व्यवस्थापक तन्मय कोमटी यांनी खा. अशोकराव चव्हाण यांची सदिच्छा भेट घेऊन नवीन कार्यालयाच्या कामकाजाची माहिती दिली. या कार्यालयात १५ ते २० कर्मचाऱ्यांची टीम कार्यरत असणार आहे. नांदेडमध्ये हे कार्यालय सुरू झाल्यामुळे या सातही जिल्ह्यांतील पेट्रोल पंपांच्या वितरणाशी संबंधित प्रश्न, देखभाल आणि नवीन सेवांच्या अंमलबजावणीला आता अधिक वेग मिळणार आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या