मालमत्ता कर थकबाकीवरील शास्तीत 80 टक्के भरघोस सुट;लोक अदालतीच्या एका दिवसासाठी महापालिकेकडुन नागरिकांना दिलासा

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 07/05/2026 8:19 PM

नांदेड : महानगरपालिकेच्या सालसन २०२५-२६ मधील मालमत्ता कर थकबाकीवरील शास्तीत ८० टक्के भारघोस सुट देण्याची घोषणा *पालिका आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे* यांनी केली आहे. सदरील सुट दिनांक ०९.०५.२०२६ रोजी आयोजित लोक अदालीतीच्या एका दिवसासाठी असणार असुन यामुळे मोठ्या प्रमाणावर कर थकीत असलेल्या मालमत्ता धारकांना याचा लाभ होणार आहे.

नांदेड महानगरपालिकेने सालसन २०२६-२७ मध्ये १०० टक्के मालमत्ता कर व पाणीपट्टी वसुलीचे उदिष्ट ठेवले असुन त्याअनुषंगाने वसुलीस सुरुवात करण्यात आलेली आहे. याचाच भाग म्हणुन दिनांक ०९.०५.२०२६ रोजी लोकअदालीचे आयोजन करण्यात आले असुन महानगरपालिका हद्दीतील मालमत्ता धारकांना लाभ प्राप्त व्हावा व थकीत कराच्या वसुलीस चालना देण्याच्या दृष्टीकोणातुन महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम प्रकरण ८ नियम ४१ व ५१ मधील तरतुदीनुसार मनपा आयुक्तांना असलेल्या प्राप्त अधिकारानुसार आयोजित लोक अदालतीलमध्ये जे मालमत्ताधारक आपल्या मालमत्ता कराचा थकबाकीसह साल सन २०२६-२७ चा पुर्ण कराचा भरणा करतील त्यांना मालमत्ता थकबाकीवरील शास्तीमध्ये लोक अदालतीच्या एका दिवसासाठी भरघोस अशी ८० टक्के सुट देण्यात येणार आहे.

तरी महानगरपालिका क्षेत्रातील नागरीकांनी या एका दिवसासाठी असलेल्या योजनेचा लाभ घेऊन दिनांक ०९.०५.२०२६ रोजी आयाजित लोक अदालतीमध्ये आपल्या थकीत मालमत्ता कराचा भरणा करावा तसेच मनपाकडून होणाऱ्या जप्ती, नळबंद, ड्रेनेज बंद, लिलाव इत्यादी अप्रिय घटना टाळुन महापालिकेस सहकार्य करण्याचे आवाहन *अतिरिक्त आयुक्त निलेश सुंकेवार* यांनी केले आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या