सांगली शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या कृष्णा नदीवरील आयर्विन पुलाला समांतर असणाऱ्या नव्या पुलावर बसविण्यात आलेल्या आकर्षक आणि आधुनिक पथदिव्यांच्या लोकार्पण सोहळ्याचा शुभारंभआमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या हस्ते संपन्न झाला.
या पथदिव्यांमुळे पुलाचा परिसर अधिक उजळ, सुरक्षित आणि आकर्षक बनणार असून नागरिकांना रात्रीच्या वेळी अधिक सोयीस्कर प्रवासाचा अनुभव मिळणार आहे. सांगली शहराच्या सुशोभीकरण आणि आधुनिक विकासासाठी कायम कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही त्यांना यावेळी दिली.
यावेळी भाजपा राज्य परिषद सदस्य प्रकाश बिरजे, जिल्हा नियोजन समिती सदस्य भारतीताई दिगडे, मनपा स्थायी समिती सभापती अतुल माने, विजय दादा कडणे, भाजपा नगरसेवक आणि नगरसेविका, भाजपा पदाधिकारी, मंडलध्यक्ष, शक्ती केंद्र प्रमुख, बूथप्रमुख, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.