सांगली- पेठ रस्यांवरील वारंवार अपघाताबाबतीत आमदार जयंत पाटील यांची पोलीस अधिकाऱ्यांसमवेत बैठक

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 08/05/2026 10:31 AM

सांगली - पेठ रस्त्यावर अपघातांचे प्रमाण वाढल्याचे निदर्शनास येत असल्याने आज उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या कार्यालयात आमदार जयंत पाटील यांनी  अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली. आवश्यक त्या उपाययोजना तात्काळ करण्याच्या सुचना दिल्या. 

सांगली पेठ रस्त्याचा दर्जा सुधारल्याने वाहनांचा वेग वाढला आहे. त्यामुळे अपघातांच्या प्रमाणात देखील वाढ झाली आहे. होणारे अपघात रोखण्यासाठी वेगनियंत्रक कॅमेरे, रम्बलर बसविणे, रस्त्यावर असलेल्या दुभाजकाच्या वळणांच्या ठिकाणी यलो लाईट ब्लिंकर्स बसविणे, आष्टा व उरूण ईश्वरपूर हद्दीतील स्ट्रीटलाईट सुरु करणे आदी सुचना अधिकाऱ्यांना दिल्या. 

तसेच उरूण ईश्वरपूर शहरातील वाहतूक कोंडी व पार्किंग व्यवस्थेचा आढावा देखील घेतला. शहर सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या सुचना दिल्या. कराड - तासगाव, ईश्वरपुर - ताकारी रस्त्यावरील व्यवस्थेचा देखील आढावा घेतला. 

यावेळी बैठकीस उपविभागीय पोलीस अधिकारी अरुण पाटील, नगरपालिका मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता  स्वप्निल पाटील, प्रविण बिराजदार, पोलीस निरीक्षक संदीप पाटील, वाहतूक सहाय्यक पोलीस निरीक्षक अल्पेश लावंड, अधिकारी वर्ग उपस्थित होते.

Share

Other News

ताज्या बातम्या