राज्यस्तरीय किकबॉक्सिंग स्पर्धेसाठी नांदेड जिल्हयाच्या 23 खेळाडूंची निवड.

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 08/05/2026 9:02 AM

नांदेड :- पुणे येथील पुलगाव येथे 8 ते 10 मे दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय किकबॉक्सिंग स्पर्धेसाठी नांदेड जिल्हयातील 23 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. या स्पर्धेत संपूर्ण राज्यभरातून मोठया प्रमाणात खेळाडू सहभागी होणार असून नांदेड जिल्हयासाठी ही अभिमानाची बाब मानली जात आहे.

नांदेड जिल्हास्तरीय किकबॉक्सींग स्पर्धा 12 एप्रिल रोजी पार पडली होती. या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणाऱ्या खेळाडूंची उत्कृष्ट कामगिरी करत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चीत केले. सदर स्पर्धा पुलगाव, पुणे येथील नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिक स्कूलमध्ये आयोजित करण्यात आल्या आहेत. राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेले खेळाडू पुढील प्रमाणे :-

आयुष ढगे, स्तुती मेंडकीकर, हदया जैस्वाल, हरगूनकौर, जैनब तन्वीश, सिमरन शेख, कायरा बिसेन, इरफान खान, ज्योतिरादित्य मुठे, मोहम्मद अब्दुल रहेमान, मोहम्मद अब्दुल्ला. जयदीप मोरे, तेजस सावते, गणराज शीरमेवार, विनयकुमार श्रीराम, भार्गवी भंडारे, यश खेडकर, अर्णव कुमठेकर, व्यंकट मुंडे, कुणाल वाघमारे, प्रिंन्स गायकवाड सुखवीरसिंग बुटार आणि सतविंदर सिंग वसिर.

या सर्व खेळाडूंना प्रशिक्षक दिपा गवळे व गणेश सावते याचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच ब्लेझ कॉम्बॅट अँड फिटनेस क्लबचे संचालक तथा नांदेड जिल्हा किकबॉक्सिंग स्पोर्टस असोसिएसशनचे सचिव किरण गवळे यांनी सर्व निवड झालेल्या खेळाडूंना राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा देत उत्कृष्ट कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली.

Share

Other News

ताज्या बातम्या