अ.भा.युनायटेड पद्मशाली समाज संघटनेच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न;फेब्रुवारी 2027 मध्ये उप वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 28/06/2026 5:09 PM

नांदेड:-नांदेड शहरातील दत्तनगर परिसरातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने अखिल भारतीय युनायटेड पद्मशाली समाज संघटनेचे उपाध्यक्ष तथा प्रसिद्ध उद्योगपती गोपाल गोरंट्याल यांच्या पुढाकारातून महादेव मंदिर परिसरात भव्य मोफत सर्वरोग निदान,आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.या शिबिराला समाजबांधवांसह स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने शेकडो रुग्णांची आरोग्य तपासणी करून आवश्यक वैद्यकीय सल्ला व उपचार मार्गदर्शन केले.विशेषतः श्रवणदोष असलेल्या नागरिकांसाठी स्वतंत्र तपासणीची व्यवस्था करण्यात आली होती.यावेळी समाजसेवक गणेश महाजन यांच्या सहकार्याने ५० ते ५५ गरजू रुग्णांना मोफत श्रवणयंत्रांचे (कान मशीन) वाटप करण्यात आले.या उपक्रमाचे नागरिकांनी मोठ्या प्रमाणात स्वागत केले.यावेळी आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरालाही युवकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सामाजिक बांधिलकी जपली.आरोग्य तपासणी,वैद्यकीय सल्ला,औषधोपचार व रक्तदान अशा विविध सेवांमुळे शिबिर अत्यंत यशस्वी ठरले.कार्यक्रमात बोलताना आयोजकांनी समाजहिताचे विविध उपक्रम सातत्याने राबविण्याचा निर्धार व्यक्त केला.तसेच फेब्रुवारी महिन्यात अखिल भारतीय युनायटेड पद्मशाली समाज संघटनेच्या वतीने फेब्रुवारी 2027 मध्ये भव्य उप वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.या मेळाव्याचा समाजातील युवक-युवतींनी लाभ घ्यावा,असे आवाहनही करण्यात आले.
या प्रसंगी शास्त्री अडकटलवार,जगन्नाथ बिंगेवार,गणेश महाजन,प्रणिता वसमतकर,किशोर राखेवार,सुभाष बल्लेवार,तुळशीदास भुसेवार,शंकरराव कुंटूरकर,व्यंकटराव चिलवरवार,महेंद्र दासरवार,उमेश कोकूलवार,प्रगती निलपत्रेवार, मीनाक्षी पोलासवर,विजय गड्डम,डॉ.बोटलावार,गणेश गड्डम,गजानन वासमवार,बालाजी निलपत्रेवार,सदाशिव मारावार,सूर्यकांत दासरवार,चंद्रकांत अन्कमवार, अशोक चटलावार,सत्यानंद शिवरात्री,अण्णा आनंदास,शिवाजी कोकूलवार,काशिनाथ लोकमानवार, शिवराज दासरवार,प्रकाश तेलेवार,महारुद्र हसनपल्ली,रामलू बलीकोडवार,श्रीनिवास माडेवार,शंकर पोलासवार,जीवन घोगरे, संजय टिपरसवार,गोपी सुरम,श्रीनिवास वडनाला,श्रीराम रमेश,सुरेश वासलवार,गंगाधर बोडू,लक्ष्मण नल्ला,मेरुगु संजय,उपलपल्ली गंगाधर,देवन पल्ली लक्ष्मण,सौ.रेखा जिंदम,चंद्रकला टिपरसवार,जयश्री चन्ना,अनुजा आनंदास,गंगुताई वासलवार,लक्ष्मी सोलापूर,मिरा उडतेवार यांच्यासह समाजातील महिला,युवक व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.आरोग्यसेवा,सामाजिक बांधिलकी आणि समाजहिताचे उपक्रम यांचा सुंदर संगम घडवून आणणारे हे शिबिर यशस्वी ठरल्याने उपस्थितांनी आयोजकांचे कौतुक केले.

Share

Other News

ताज्या बातम्या