नांदेड : नांदेड शहर महानगरपालिकेच्या वतीने ५ वर्षांखालील सर्व बालकांसाठी पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ महापालिकेच्या जंगमवाडी येथील आरोग्य केंद्रात करण्यात आला आहे. शहरात एकही बालक पोलिओ डोसपासून वंचित राहू नये, यासाठी नांदेडच्या महापौर *सौ.कविता संतोष मुळे* यांनी सर्व नांदेड शहरवासीयांना आपल्या मुलांना पोलिओ लस देण्याचे जाहीर आवाहन केले आहे.याप्रसंगी *उपमहापौर दिपकसिंह रावत* यांची सुद्धा प्रमुख उपस्थिती होती.
या मोहिमे अंतर्गत ० ते ५ वर्षे वयोगटातील सर्व बालकांना पोलिओचे 'दोन थेंब' पाजणे आवश्यक असुन पोलिओमुक्त भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी पालकांनी स्वतःहून पुढे यावे असे आवाहन यावेळी महापौरांनी केले.शहरातील सर्व शासकीय रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि अंगणवाड्यांमध्ये हा पोलिओ डोस उपलब्ध आहे त्याचप्रमाणे बसस्थानक, रेल्वे स्टेशन आणि मुख्य चौकांमध्ये विशेष बुथ कार्यरत असुन मोहिमेच्या पहिल्या दिवशी सुटलेल्या बालकांसाठी आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत घरोघरी जाऊन मोहीम राबवली जाईल.पोलिओ हा एक घातक आजार असून, केवळ नियमित लसीकरणामुळेच त्याचा समूळ उच्चाटन करणे शक्य आहे. त्यामुळे आपल्या घरातील आणि परिसरातील ५ वर्षांखालील प्रत्येक बालकाला जवळच्या पोलिओ केंद्रावर नेऊन डोस नक्की द्यावा, असे आवाहन महापौर सौ.कविता संतोष मुळे आणि महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.
याप्रसंगी महिला व बाल कल्याण सभापती सदिच्छा सोनी पाटिल,आरोग्य उपसमितीचे अध्यक्ष डॉ.अंकुश देवसरकर, अतिरिक्त आयुक्त निलेश सुकेवार, उपायुक्त स.अजितपालसिंघ संधु, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.हनुमंत रिठ्ठे, लसिकरण अधिकारी डॉ.बालाप्रसाद कुंटुरकर, शहर क्षयरोग अधिकारी डॉ.मो.बदिओदिन आदी उपस्थित होते.
आज दिनांक २८ जुन रोजी महापालिका हद्दीतील सर्व लसीकरण केंद्रांवर पाच वर्षाखालील बालकांचे पोलिओ लसीकरण करण्यात येणार असून नांदेड़ शहरात पुढील ०५ दिवसापर्यंत घरोघरी भेटी देऊन आरोग्य कर्मचाऱ्यामार्फत पोलिओ लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती *उपायुक्त स.अजितपालसिंघ संधु* यांनी दिली आहे.