महासभेत घरपट्टी वाढ रद्द न झाल्यास कुपवाड संघर्ष समितीचा २२ जुलैपासून आमरण उपोषणाचा इशारा

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 18/07/2026 9:23 PM

सांगली मिरज कुपवाड व शहर महानगरपालिकेच्या 20 जुलै च्या महासभेमध्ये अन्यायकारक वाढीव  घरपट्टी वाढ कमी न केल्यास कुपवाड शहर व परिसर संघर्ष समितीच्या वतीने 22 जुलै पासून कुपवाड मध्ये समितीच्या वतीने आमरण उपोषणाचा इशार संदर्भात आयुक्त संचिता महापात्र, महापौर धीरज सूर्यवंशी, उपमहापौर गजानन मगदूम, विरोधी पक्ष नेते मंगेश चव्हाण, सहाय्यक आयुक्त कुपवाड कार्यालय येते निवेदन देण्यात आले. 

त्यावेळी उपस्थित मान्यवर समितीचे अध्यक्ष प्रा.अशोक रासकर, कार्याध्यक्ष आशुतोष धोतरे, उपाध्यक्ष गोरख व्हनकडे व कुलभूषण कर्नाळे, खजिनदार अरुण रुपनर, सचिव दाऊद मुजावर, माजी नगरसेवक शेडजी मोहिते, सामाजिक कार्यकर्ते अकतरहुसेन मुजावर, मुस्ताक रंगरेज, तानाजी गडदे, विजय खोत, अनिस मुजावर, अजय कोरे, मुदतसर मुजावर, श्रेयस माळी इत्यादी उपस्थित होते.


कुपवाड शहर व परिसर संघर्ष समिती कुपवाड.

Share

Other News

ताज्या बातम्या