*विनाशकाले विपरीत बुद्धी*
ही म्हण कुठंतरी लागू होतेय असं म्हणणं वावगं नाही,
चार दिवसांपूर्वी महापालिका प्रशासनाने अगदी स्पष्ट केलं की नवीन करवाढ आणि त्यानुसार अंतिम बिलं पाठवली आहेत,
आणि आज वृत्तपत्रात बातमी वाचली की मा.आमदारांनी देखील या करवाढीचे समर्थन केलं, व ते करतांना शहरातील 90% लोकांना म्हणे हा कर मान्य आहे,ते समाधानी आहेत असं वक्तव्य समर्थन करताना केलं,
इथं 99% लोकांनी आक्षेप घेतला आहे, आणि 10% की ज्यांना काहीही फरक पडत नाही असे लोक आहेत हे आमचं स्पष्ट मत आहे व तीच वस्तुस्थिती आहे,
*तिप्पट-चौपट पैसे देऊन कोण समाधानी असू शकतं??*
वास्तविक मोठया प्रमाणात हरकती दाखल आहेत,नोटीस वरील क्यू आर कोड हा स्कॅन होत नाही,झाला तर पुढं जात नाही,स्कॅन केलेली हरकत त्याची पोहोच मिळत नाही,आणि आता तर नोटीस येऊन घेऊन जावा असं फर्मान काढलं त्यात तर सपशेल सांगत आहेत,21 दिवस होऊन गेले, आता अंतिम बिल येईल,
*सगळं रेटून न्ह्यायचं सुरू आहे,जबरदस्ती वसुली असं म्हणतात याला,ही बाब मा.आमदारांना का दिसली नाही??*
◼️मुळात राज्यसरकार चा आदेश स्पष्ट आहे,-
भांडवली मूल्यानुसार करवाढ झालेली घरपट्टी ही त्याच्या मागील वर्षी पेक्षा जास्तीतजास्त 40% पेक्षा जास्त असू नये,म्हणजे जास्तीतजास्त करवाढ 40%
उदा. समजा जुनी 5000 असेल तर नवीन 7000 जास्तीतजास्त होईल◼️ *पण इथं आयुक्त मोठे की राज्यसरकार??हा गंभीर प्रश्न निर्माण होतोय*,ही बाब लोकप्रतिनिधी ना दिसली नाही का??का सोयीस्कर बघायची नाही??
इतका मोठा विरोध सुरू आहे,लोक टाहो फोडत आहेत,मग 90% लोक समाधानी कसे असू शकतील??
जागेचे क्षेत्रफळ मोजण्याची पद्धत तर केवळ बोगस आहे,एकाच प्लॉटवर तीनवेळा आकारणी,सदनिकेचे रेट हे सगळं भीषण आहे, आणि प्रशासन ऐकून घेत नाही हेतर त्याहून भीषण आहे,
मागील वेळी निवडणुका होत्या म्हणून स्थगिती दिली, आणि आता निवडणुका नाहीत म्हणून करवाढ हे तुम्हीच बोलून दाखवताय ,म्हणजे किती संवेदनशील आहात तुम्ही सत्ताधारी हे कृतीतून समजलं,
लोकांच्या खिशाला जाणीवपूर्वक लावलेली कात्री लोक कधीच विसरत नाहीत,आणि असली कात्री तर अजिबात नाही,
अद्यापही वेळ गेलेली नाही,सर्वच लोकप्रतिनिधी नी पुंनर्वीचार करावा व ह्या सर्व प्रक्रियेस स्थगिती द्यावी,
अन्यथा आंदोलन तर होईलच पण त्याचे दूरगामी राजकीय परिणाम दिसतील यात कोणतीही शंका ठेवू नये
धन्यवाद,
*कुपवाड शहर व्यापारी संघटना*