"संकटाच्या काळात धावून जाणारेच खऱ्या अर्थाने देवदूत असतात..."
सोलापूर जिल्ह्यामध्ये आलेल्या भीषण पुराच्या काळात 'आयुष हेल्पलाईन' टीमने अत्यंत मोलाची व कौतुकास्पद कामगिरी बजावली होती. त्यांच्या याच असीम धाडसाचे आणि उल्लेखनीय कार्याचे कौतुक म्हणून सांगली जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील व सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या शुभहस्ते 'सन्मान पत्र' देऊन गौरविण्यात आले!
आयुष हेल्पलाईन टीमचे प्रमुख अविनाश पवार यांनी हा सन्मान स्वीकारला. या ववेळी आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नदाफ सर, आयुष हेल्पलाईन टीमचे सर्व सदस्य उपस्थित होते
"आपत्ती कोणतीही असो, मदतीचा हात पुढे करण्यासाठी आयुष हेल्पलाईन टीम नेहमीच तत्पर असते. हा सन्मान आमच्या पाठीवर कौतुकाची थाप देणारा असून, भविष्यात आणखी जोमाने काम करण्याची ऊर्जा देईल!"
— अविनाश पवार (प्रमुख, आयुष हेल्पलाईन टीम)
आयुष हेल्पलाईन टीमच्या सर्व सदस्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा..