शिष्यवृत्ती परीक्षेत श्रीराज शिंदे याचे घवघवीत यश

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 18/07/2026 9:53 PM

जिल्हा गुणवत्ता यादीत ६२ वा क्रमांक; ३०० पैकी २३४ गुण प्राप्त

कुपवाड : प्रतिनिधी :

 महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेच्या नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात श्रीराम दयाल मालू हायस्कूल येथील विद्यार्थी श्रीराज भारत शिंदे याने उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

सदर परिक्षेसाठी जिल्ह्यातून 21822 विद्यार्थी परीक्षेस बसले होते त्यामध्ये श्रीराजने  ३०० पैकी २३४ गुण मिळवत उत्कृष्ट कामगिरी केली असून, सांगली जिल्हा गुणवत्ता यादीत ६२ वा क्रमांक पटकावला आहे. त्याच्या या यशामुळे शाळेसह परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

अभ्यासातील सातत्य, मेहनत आणि शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन यांच्या जोरावर श्रीराजने हे यश मिळविले आहे. त्याच्या या उल्लेखनीय यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद तसेच पालकांनी त्याचे अभिनंदन केले आहे.

श्रीराजच्या यशामुळे इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळणार असून, भविष्यातही तो शैक्षणिक क्षेत्रात अशीच उत्तुंग भरारी घेईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
श्रीराज भारत शिंदे यांचे या यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या