विक्री खरेदी खतातील मालमत्ता ' दुरुस्ती दस्त ' करून बदलता येणार नाही : सर्वोच्च न्यायालय

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 16/07/2026 6:24 PM

सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे की, नोंदणीकृत विक्रीखतात नमूद केलेल्या मालमत्तेची ओळख किंवा मूळ विषयवस्तू केवळ दुरुस्ती दस्ताद्वारे बदलता येणार नाही. असा मूलभूत बदल करण्यासाठी मूळ हस्तांतरणकर्त्याचा सहभाग आणि संमती आवश्यक आहे; दुरुस्तीच्या नावाखाली एक मालमत्ता काढून दुसरी मालमत्ता समाविष्ट करता येत नाही.

न्यायालयाने सांगितले की, दुरुस्ती दस्ताचा उद्देश व्यवहारातील लेखनदोष किंवा परस्पर चूक सुधारणे हा आहे-मूळ कराराचा विषयच बदलणे नाही. त्यामुळे मालमत्ता खरेदी-विक्री करताना सर्व्हे क्रमांक, सीमा, क्षेत्रफळ, मालकीहक्काची साखळी आणि मूळ विक्रेत्याची संमती काळजीपूर्वक तपासणे अत्यंत महत्त्वाचे ठरते.

जनहितार्थ : गुंठेवारी चळवळीचे जनक चंदनदादा चव्हाण.
Mo : 9421245003.

Share

Other News

ताज्या बातम्या