वाढीव घरपट्टी विरोधात कृती समितिच्या वतीने मनपासमोर जोरदार ' बोंबाबोंब ' आंदोलन

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 20/07/2026 6:06 PM

सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेने नागरिकांवर लादलेल्या अन्यायी व अवाजवी घरपट्टी वाढीच्या निषेधार्थ तसेच ही वाढ तात्काळ रद्द करण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी आज महानगरपालिका मुख्य इमारतीसमोर वाढीव घरपट्टी विरोधी कृती समितीच्या वतीने जोरदार ‘बोंबाबोंब आंदोलन’ करण्यात आले.

महानगरपालिका प्रशासनाच्या निष्क्रिय भूमिकेचा तसेच घरपट्टी वाढीचे समर्थन करणारे मा. पालकमंत्री, आमदार आणि नगरसेवक यांच्या विरोधात आंदोलनकर्त्यांनी तीव्र घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला. या आंदोलनात विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, व्यापारी संघटना तसेच अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

या आंदोलनात वाढीव घरपट्टी विरोधी कृती समितीचे निमंत्रक व सामाजिक कार्यकर्ते श्री. सतीश साखळकर, माजी नगरसेवक श्री. हणमंतराव पवार, माजी नगरसेवक श्री. वि. द. बर्वे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष श्री. पद्माकर जगदाळे, काँग्रेस पक्षाचे नेते श्री. रवींद्र वळवडे, माजी नगरसेविका सौ. ज्योती आदाटे, मराठा क्रांती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष डॉ. संजय पाटील, शेतकरी कामगार पक्षाचे नेते व माजी नगरसेवक ॲड. अजित सूर्यवंशी, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रा. बाळासाहेब मासुले, समाजवादी पार्टीचे जिल्हाध्यक्ष श्री. नितीन मिरजकर, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉ. उमेश देशमुख, जनता दल (सेक्युलर) पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष डॉ. जयपाल चौगुले, माजी नगरसेवक श्री. हरिदास पाटील, माजी नगरसेवक श्री. योगेंद्र थोरात, मराठा सेवा संघाचे श्री. नितीन चव्हाण, शिवसेना पक्षाचे नेते श्री. सुरेश टेंगले, काँग्रेस पक्षाचे नेते व माजी नगरसेवक श्री. प्रमोद सूर्यवंशी, जनता दल (सेक्युलर)चे जिल्हा कार्याध्यक्ष श्री. शशिकांत गायकवाड, शिवसेना पक्षाचे नेते श्री. उत्तमराव कांबळे, ग्राहक पंचायतचे जिल्हा सचिव श्री. मोहन जगताप, इंजी. रवीकुमार पाटील, ग्राहक पंचायतचे डॉ. ज्ञानचंद्र पाटील, जयहिंद सेना पक्षाचे राज्य उपाध्यक्ष श्री. नईम शेख, सामाजिक कार्यकर्त्या मीरा सिंहासने, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते श्री. रूपेश मोकाशी, सामाजिक कार्यकर्ते श्री. महेश सागरे, माजी नगरसेवक कॉ. शंकर पुजारी, पानपट्टी असोसिएशनचे राज्य नेते श्री. अजित सूर्यवंशी, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक जिल्हाध्यक्ष श्री. आकाश माने, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे जिल्हा सचिव कॉ. विजय बचाटे, श्री. रत्नाकर गोंधळी, श्री. विजयकुमार कांबळे, श्री. राहुल पाटील, कॉ. इब्राहिम पेंढारी, श्री. आनंद देसाई, श्री. विवेकानंद मिरजकर, श्री. तोहिद फकीर, श्री. दादासाहेब कोळेकर यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share

Other News

ताज्या बातम्या