शेटे महाविद्यालयात भारतीय स्वातंत्र्यसेनानी लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी

  • भास्कर सोनवणे (नाशिक(भगूर))
  • Upadted: 01/08/2026 9:50 PM

शेटे महाविद्यालयात भारतीय असंतोषाचे जनक, निर्भीड पत्रकार, थोर स्वातंत्र्यसेनानी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी

         शिक्षण मंडळ भगूर संचलित श्री एकनाथराव सहादू शेटे कला, वाणिज्य व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

            कार्यक्रमाच्या प्रारंभी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मृत्युंजय कापसे यांनी मार्गदर्शन करताना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य,      समाजप्रबोधन व सामाजिक परिवर्तनातील योगदानाचा तसेच लोकमान्य टिळक यांच्या राष्ट्रनिर्माण, शिक्षण, पत्रकारिता आणि भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील मोलाच्या कार्याचा सविस्तर आढावा घेतला. त्यांनी विद्यार्थ्यांनी या महान विभूतींचे विचार आत्मसात करून समाजहितासाठी कार्य करण्याचे आवाहन केले.

        कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. तुषार तेलोरे यांनी केले. कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share

Other News

ताज्या बातम्या