'कॉफी टेबल बुक'चे विमोचन
४० प्रमुख उद्योजकांच्या प्रेरणादायी संघर्षाची कहाणी
■ नासिक विशेष प्रतिनिधी- अंबड इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (आयमा) कडून हॉटेल रॅडिसन ब्लू मध्ये 'दूरदृष्टि से विजय : यंत्रों से परे - दृढ़ संकल्प की कहानियां' नावाच्या विशेष 'कॉफी टेबल बुक'चे भव्य विमोचन पार पडले. या ग्रंथामध्ये नाशिकच्या औद्योगिक विकासाला दिशा देणाऱ्या ४० प्रमुख उद्योजकांच्या प्रेरणादायी संघर्ष आणि यशाच्या गाथांचा समावेश करण्यात आला आहे.
या कार्यक्रमात 'एथर एनर्जी'चे सह-संस्थापक आणि सीईओ स्वप्निल जैन हे मुख्य अतिथी म्हणून, तर 'आर.आर. केबल'चे व्यवस्थापकीय संचालक श्रीगोपाल काबरा सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते या पुस्तकाचे विमोचन करण्यात आले आणि सर्व ४० उद्योजकांचा सन्मान करण्यात आला.
उद्योगांमध्ये नवनिर्मितीला (नवाचार) प्राधान्य दिले जावे
स्वप्निल जैन यांनी आपल्या भाषणात सांगितले की, बदलत्या काळात उद्योगांमध्ये नवसंशोधन (नवाचार), संशोधन आणि गुणवत्तेला प्राधान्य दिले पाहिजे. अशा यशाच्या कहाण्या नवीन पिढीसाठी मार्गदर्शक ठरतात.
तसेच श्रीगोपाल काबरा यांनी व्यापारातील सातत्य, गुणवत्ता आणि ग्राहकांचा विश्वास हीच यशाची मुख्य गुरुकिल्ली असल्याचे सांगितले. त्यांनी नाशिकच्या उद्योजकांना निर्यात वाढवण्याचे आणि नवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्याचे आवाहन केले.
आयमाचे अध्यक्ष राजेन्द्र पानसरे यांनी सांगितले की, प्रतिकूल परिस्थितीत उद्योग उभे करणाऱ्या उद्योजकांचे योगदान आणि नाशिकचा औद्योगिक प्रवास जतन करण्याच्या उद्देशाने या ग्रंथाचे संपादन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाला 'आयमा'चे पदाधिकारी, ज्येष्ठ उद्योजक दादासाहेब पानसरे यांचा विशेष सत्कार करण्यात आला तसेच कार्यक्रमाला आई माझे पदाधिकारी. आणि गणमान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.