ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

चार मृत्यूसह गेल्या चोवीस तासात 25 बाधित तर 119 कोरोनामुक्त - गडचिरोली


  • देवेंद्र देविकार (DHANORA)
  • Upadted: 11/30/2020 7:22:18 PM

गडचिरोली, (जिमाका) दि.30 :-

         गेल्या चोवीस तासात चार मृत्यूसह जिल्हयात 25 नवीन बाधित आढळून आले तसेच 119 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 7940 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 7243 वर पोहचली. तसेच सद्या 614 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 83 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. नवीन चार मृत्यूमध्ये पांढरपाणी कोरची येथील 50 वर्षीय पुरूष, डोकेसारंगी वडसा येथील 49 वर्षीय पुरूष, देलानवाडी आरमोरी येथील 66 वर्षीय पुरूष व 52 वर्षीय नवेगाव सुयोग नगर गडचिरोली येथील पुरूषाचा समावेश आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 91.22 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 7.73 टक्के तर मृत्यू दर 1.05 टक्के झाला.

नवीन 25 बाधितांमध्ये गडचिरोली 18, अहेरी 1, आरमोरी 0, भामरागड 0, चामोर्शी 0, धानोरा 0, एटापल्ली 1, कोरची 1, कुरखेडा 3, मुलचेरा 0, सिरोंचा 0  व वडसा येथील 1 जणांचा समावेश आहे. 

आज कोरोनामुक्त झालेल्या 119 रूग्णांमध्ये गडचिरोली 55, अहेरी 8, आरमोरी 2, भामरागड 1, चामोर्शी 9, धानोरा 4, एटापल्ली 6, मुलचेरा 2, सिरोंचा 4, कोरची 1,  कुरखेडा 15 व वडसा मधील 12 जणाचा समावेश आहे.

गडचिरोली तालुक्यातील नवीन इतर जिल्हा 1, नवेगाव 4, शहरातील इतर 9, विश्रामपूर 1, वनश्री कॉलनी 1, साईनगर 1, रामनगर 1 जणाचा समावेश आहे. अहेरी येथील 1 छल्लेवाडा येथील आहे. एटापल्ली येथील 1 स्थानिक आहे. कोरची मधील 1 स्थानिक आहे. कुरखेडा 2 मधील 1 पुराडा च 2 स्थानिक आहे.  तर वडसा मधील 1 जण शहरातील आहे.


राजेश नाथानी (गडचिरोली तालुका प्रतिनिधी)
9422355550

Share

Other News