डांभेवाडी येथे विवाहीतेची गळफास घेवून आत्महत्या : सासरच्या लोकांविरोधात गुन्हा..!

  • मुख्यसंपादक (Kolhapur)
  • Upadted: 23/01/2021 5:25 PM

सासरच्या जाचहाटाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या....
दहिवडी/प्रतिनिधी : डांभेवाडी (ता. खटाव) येथील सारिका विशाल बागल (वय 29) या विवाहीत महिलेने सासरच्या जाचहाटास कंटाळून राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. या आत्महत्येप्रकरणी पती व सासू-सासर्‍याच्या विरोधात मयत विवाहीतेचे वडील लाला गोविंद शिंदे (वय 60) रा. भालवडी ता. माण यांनी वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी, मयत सारिका व विशाल बागल यांचा 13 नोव्हेंबर 2000 रोजी विवाह झाला होता. सारिका हीस श्रेयश्री, ध्रुवा या दोन मुली व शिवम् हा लहान मुलगा आहे. लग्नानंतर तिचा संसार काही दिवस ठिक होता. मात्र काही वर्षानंतर सासू छबुताई बागल व सासरे लालासोा बागल हे तिला तुला घरातील कामे नीट येत नाहीत. मुले व्यवस्थित सांभाळत नाही. या कारणावरुन टोचून बोलत होती. हा सर्व प्रकार माहेरी आल्यानंतर तिने अनेकवेळा सांगितला होता. मात्र आई-वडिलांनी तिची समजूत काढून परत पाठविले होते. काही वेळेला माहेरहून शेतीसाठी पैसे घेवून येण्याच्या कारणावरुन सारिका हिस मारहान व शिवीगाळ केली जात होती. त्याचबरोबर अनेकवेळा तिला उपाशी ठेवले जात होते. तर पती विशाल हे वडूजला जातो असे सांगून चार चार दिवस घरातून गायब होत असत. याबाबत विचारणा केली असता ‘ तुझी आता मला गरज नाही तु निघून जा ’ असे पतीकडून सांगितले जायचे. या शारिरीक, मानसिक त्रासाला कंटाळून सारिका हिने 22 जानेवारी 2021 रोजी सायंकाळच्या वेळेस राहते घरी गळफास घेवून आत्महत्या केली. याबाबत वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. अधिक तपास हावलदार वाघमारे करत आहेत.

Share

Other News

ताज्या बातम्या