नांदेड:-फुले-शाहू-आंबेडकर बहुजन विकास मंडळ संचलित महात्मा ज्योतिबा फुले वाचनालय, अभ्यासिका व बाल संस्कार केंद्र, श्रावस्ती नगर,नांदेड येथे चि. अद्विक अजय सोनकांबळे याच्या तिसऱ्या वाढदिवसानिमित्त गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करून वाढदिवस सामाजिक बांधिलकी जपत दिनांक 12 सप्टेंबर 2026 रोजी साजरा करण्यात आला.
उपासिका सुमनबाई मोहन कुंटे यांच्या पुढाकारातून या सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता गरजू विद्यार्थ्यांना वही,पेन व अन्य शैक्षणिक साहित्य देऊन त्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याबरोबरच खाऊचेही वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिलीप पाईकराव होते.नितीन तारू यांनी प्रास्ताविक केले,तर ऋचा पाईकराव यांनी सूत्रसंचालन केले.
यावेळी दिगांबर दादा हानमंते, सुरेखा राहुल गायकवाड,सुषमा डोंगरे,रुक्माजी कोसरे,लिंबाबाई कोसरे,मंगलाबाई पाईकराव,राजू बहिरे यांच्यासह वाचनालयाचे पदाधिकारी,कार्यकर्ते,विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविणारा हा उपक्रम उपस्थितांकडून कौतुकास्पद ठरला.उपस्थित मान्यवरांनी अद्विकला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी मंगलमय शुभेच्छा व्यक्त केल्या.