नांदेड : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक १२.०९.२०२६ रोजी महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या लोक अदालतीच्या अनुषंगाने मालमत्ता धारकांना आपल्या मालमत्ता करा विषयी असलेल्या तक्रारीचे निवारण करुन नागरिकांनी मालमत्ता कराचा भरणा करुन महानगरपालिकेस सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले होते. या राष्ट्रीय लोक अदालतीसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणा मार्फत ज्या मालमत्ता धारकांचा मालमत्ता कर थकित आहे त्यांना नोटीस बजावन्यात आल्या होत्या.
या लोक आदालतीस दिनांक १२.०९.२०२६ रोजी सकाळी १०.३० वाजल्या पासुन सुरुवात करण्यात आली. राष्ट्रीय लोक अदालतीसाठी आलेल्या मालमत्ताधारकांना मनपा आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे, न्यायाधीश आर.पी.शिंदे अतिरिक्त आयुक्त निलेश सुंकेवार यांनी कायदेविषयक बाबी समजावून सांगितल्या व मालमत्ताधारकांच्या तक्रारीचे निरसन केले. आज झालेल्या राष्ट्रीय लोक अदालती मध्ये *एकुण ३२१८ मालमत्ताधारकांनी* थकबाकीवरील शास्तीत ८० टक्के सुट योजनेचा लाभ घेवुन *तब्बल रु.५,००,११,२१५/-* एवढ्या मालमत्ता कराचा भरणा केला आहे.
या राष्ट्रीय लोक अदालतीस *महापौर सौ.कविता संतोष मुळे, प्रमुख जिल्हा न्यायाधीश एन.के. ब्रह्म, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे,* सचिव विधी सेवा प्राधीकरण एस.जी. देशपांडे, न्यायाधीशा आर.पी. शिंदे, सह दिवाणी न्यायाधिश क. स्तर, नांदेड पॅनल प्रमुख श्रीमती व्ही. डी. सोनवणे, अतिरिक्त आयुक्त निलेश सुकेवार, अतिरिक्त आयुक्त गिरीष कदम, उपआयुक्त स.अजितपालसिंघ संघु, सिस्टीम मॅनेजर सदाशिव पतंगे मनपाचे क्षेत्रिय कार्यालयाचे क्षेत्रिय अधिकारी मिर्झा फरहतुल्लाह बेग, विठ्ठल तिडके, रावण सोनसळे, गौतम कवडे, राजेश जाधव, नागनाथ पतंगे, न्यायालयीन कर्मचारी शेख अखील अहमद, एम.बी. भोसीकर, डी.एल.मनसकरगेकर सर्व क्षेत्रिय कार्यालयाचे वसुली पर्यवेक्षक, वसुली लिपीक व त्यांचे सहाय्यक उपस्थित होते.
पालिका हद्दीतील ज्या मालमत्ताधारकांनी आपल्या मालमत्ता कराचा अद्याप भरणा केला नाही त्यांनी तात्काळ कर भरणा करावा व भविष्यात मनपाकडून होणा-या जप्ती, नळबंद करणे, ड्रेनेज बंद करणे, लिलाव करणे या सारख्या अप्रिय कार्यवाह्या टाळाव्यात असे आवाहन *मनपा आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे* यांनी मालमत्ता धारकांना केले आहे.