ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

बॉलिवूड 'क्वीन' कंगना रानौत विरोधात वॉरंट जारी.


  • YUNUS KHATIB (Pimpri Chinchwad )
  • Upadted: 3/2/2021 1:00:31 PM

चित्रपटांमधून आपल्या अभिनयाने प्रशंसा मिळविणारी अभिनेत्री कंगना रानौत (Kangana Ranaut)  सोशल मीडियावर तिच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे ओळखली जाते. पण आता कंगना कायदेशीर अडचणीत अडकलेली दिसत आहे. तिच्याविरूद्ध वॉरंट जारी (Bailable warrant issued against Kangana Ranaut)  करण्यात आले आहे. गीतकार जावेद अख्तर ( Javed Akhtar's complaint against Kangana)  यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या प्रकरणात हे वॉरंट जारी केले आहे.

वॉरंट देण्यामागील कारण काय?
ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांची बदनामी केल्याप्रकरणी कंगना रानौतला अंधेरी न्यायदंडाधिकारी न्यायालयाने समन्स बजावले आहे. याविषयी आज १ मार्चला सुनावणी होती. मात्र, सुनावणीस गैरहजर राहिल्यानं न्यायालयाकडून कंगनाविरोधात जामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहे.

कंगनावर कोणता आरोप?
मुंबई पोलिसांनी गेल्या महिन्यात अहवाल दाखल केला होता. ज्याबद्दल असे सांगण्यात आले की, कंगनाविरोधात मानहानीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बॉलिवूड गीतकार जावेद अख्तर यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. ज्यामध्ये जावेद अख्तरने सांगितले होते की, कंगनाने त्यांच्यावर कोणतेही आधार न घेता खोटे विधान केले आहे, ज्यामुळे त्यांच्या प्रतिमेला धक्का लागला आहे.

'तेजस' बद्दल कंगना उत्साहात
 कंगना रानौत यांनी आरएसव्हीपी (RSVP) प्रॉडक्शन हाऊसकडून मिळालेले पत्र शेअर करताना चाहत्यांना चांगली बातमी दिली होती. स्वत: आरएसव्हीपी (RSVP) प्रॉडक्शन हाऊस 'तेजस' या चित्रपटाची निर्मिती करत आहे. आदल्या दिवशी प्रॉडक्शन हाऊसने कंगनाला पत्रे आणि फुले पाठविली. या चित्रपटात कंगना एअरफोर्स अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. 

कंगना कायमच आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत राहिली आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर कंगना खूप चर्चेत आली. नेपोटीझममुळे सुशांतचा बळी गेल्याचे आरोप करत तिने बॉलिवूडमधील अनेक दिग्गज व्यक्तींवर आरोप केले होते. त्यानंतर महानगरपालिकेकडून कंगनाच्या अनधिकृत कार्यालयावर कारवाई देखील करण्यात आली होती. यासारख्या अनेक मुद्यांमुळे कंगना गेल्या काही दिवसांपासून चर्चेत राहिली आहे.

Share

Other News